17 May 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Eveready Industries India Share Price | एव्हरेडी इंडस्ट्रीज कंपनीचे तिमाही निकाल जाहीर, कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली

Eveready Industries India Share Price

Eveready Industries India Share Price | ‘एव्हरेडी इंडस्ट्रीज’ या बॅटरी आणि फ्लॅशलाइट बनवणाऱ्या कंपनीने आपले मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला एकत्रित 14.39 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तिमाही काळात कंपनीला काही प्रमाणत तोटा सहन करावा लागला असून सुद्धा शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 326.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

‘एव्हरेडी इंडस्ट्रीज’ शेअरचा इतिहास :
एव्हरेडी इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने या वर्षात फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. एव्हरेडी शेअर्सची किंमत मागील साडेचार महिन्यांत 10 टक्क्यांनी घसरली आहे. मागील सहा महिन्यांत एव्हरीडी कंपनीचे शेअर्स 4.51 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. एव्हरेडी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 393.20 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 268.35 रुपये होती.

एव्हरेडी कंपनीचे तिमाही निकाल :
सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने आपल्या तिमाही निकालात माहिती दिली की, मागील वर्षीच्या जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत कंपनीला 38.41 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तथापि कंपनीने समीक्षाधीन तिमाहीत 18.62 टक्के वाढीसह 286.17 कोटी रुपये परिचालन उत्पन्न कमावले आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीचे महसूल उत्पन्न 241.23 कोटी रुपये होती.

मार्च 2023 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत बर्मन कुटुंबाद्वारे नियंत्रित कंपनीचा एकूण खर्च 6.31 टक्क्यांच्या वाढीसह 312.92 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीचे एकूण उत्पन्न 21.32 टक्क्यांच्या वाढीसह 293.81 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eveready Industries India Share Price today on 11 May 2023.

हॅशटॅग्स

Eveready Industries India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x