5 May 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Money Making Shares | या 4 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, फ्री बोनस शेअर्स प्लस शेकड्यात परतावा मिळतोय, खरेदीचा विचार करा

Money Making Shares

Money Making Shares | पोझिशनल गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून बोनस, लाभांश, आणि स्टॉक स्प्लिट या सर्व गोष्टींचा लाभ उपभोगत असतात. शेअर बाजारात अनेक कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश जाहीर करत असतात. याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. या आठवड्यात अशा काही कंपन्या आहेत ज्यांवर लक्ष ठेवल्यास तुम्हाला मजबूत फायदा होऊ शकतो. या सर्व कंपन्यांची या आठवड्यात बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट नियोजित आहे. 2023 या नवीन वर्षाच्या आधी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट मिळणार आहे. विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना कोणती कंपनी किती बोनस शेअर्स देणार आहे, विस्ताराने जाणून घेऊ.

1) Gloster Limited :
ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 17 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 71.99 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षात आत्तापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 62.39 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख आणि एक्स बोनस डेट 16 डिसेंबर 2022 आहे.

2) स्टार हाउसिंग फायनान्स :
या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 152.15 टक्क्यांनी वाढली आहे . त्याच वेळी 2022 या वर्षात गुंतवणूकदारांनी स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून 149 टक्के परतावा कमावला आहे. स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख आणि एक्स बोनस डेट 16 डिसेंबर 2022 आहे.

3) CL Educate :
या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात नियोजित आहे. गेल्या एक वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मजबूत रिटर्न कमावले आहे. सीएल एज्युकेट कंपनीने या कालावधीत आपल्या स्थिर गुंतवणूकदारांना 29.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी 2022 या वर्षात CL Educate कंपनीच्या शेअर्सची किंमत 34.42 टक्क्यांनी वधारली आहे. सीएल एज्युकेट कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

4) Altstone Textiles India :
ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 9 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. 2022 या वर्षात Altstone Textiles India कंपनीच्या शेअरची किमत 34.42 टक्क्यांनी वधारली आहे. Alstone Textiles India कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख एक्स बोनस डेट आणि 14 डिसेंबर 2022 आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Money Making Shares which has announced Bonus shares to existing Shareholders on record date this week on 13 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x