21 March 2023 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

Stock in Focus | अलर्ट! या निवडक शेअर्सच्या ट्रॅप मध्ये अडकू नका, शेअरची लिस्ट सेव्ह करा आणि या शेअर्सपासून लांबच रहा

Stock in Focus

Stock in Focus | किरकोळ आणि लहान गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये स्वस्त किमतीच्या शेअरमध्ये सट्टा लावतात. गुंतवणूकदार सध्या कमी किमतीत उपलब्ध असेलल्या कंपन्यांचे शेअरमध्ये पैसे लावत आहेत. किरकोळ गुंतवणूकदाररांनी बाजारातील प्रत्येक घसरणीत सुधारणा मानून त्यात गुंतवणूक वाढवली आहे. बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की किरकोळ गुंतवणूकदार स्वस्त किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करून ट्रॅप होत आहेत. आणि हे शेअर्स रोज नवनवीन डाऊन साईट किंमत पातळी स्पर्श करत आहेत. गुंतवणूकदार सध्या पडलेल्या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मार्केट खूप अस्थिर असल्याने त्यांना ते जमत नाही. चला तर मग असे काही शेअर्स पाहू ज्यात गुंतवणूक करून ट्रॅप झाले आहेत.

KBC ग्लोबल या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 86 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने वाढत चालली आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 38.58 टक्के होते, जे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत वाढून 87.25 टक्के पर्यंत वाढले आहेत. त्याच वेळी फ्युचर कन्झुमर कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 75 टक्के पडले आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 12 टक्के अधिक वाढून 87.19 टक्क्यांवर गेले आहेत.

गायत्री प्रोजेक्ट या कंपनीच्या शेअरची किंमत एका वर्षात दोन तृतीयांशने घटली आहे. सद्भाव इंजिनिअरिंग कंपनी आणि धनी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 70-75 टक्के कमजोर झाले असून गुंतवणुकदारांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीतील गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 47 टक्क्यांहून जास्त वाढलेली आहे, जी मागील वर्षी सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 40 टक्क्यांहून कमी होती. गायत्री प्रोजेक्ट कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका वर्षात दोन तृतीयांशपेक्षा जास्त कमी झाली आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 75 टक्के पेक्षा अधिक होती. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 42 टक्के नोंदवली गेली होती.

Xelpmoc Design and Tech या कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 65 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर होल्डिंग 32 टक्केवरून वाढून 40 टक्केवर गेली आहे. दिलीप बिल्डकॉन आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका वर्षात अनुक्रमे 60 टक्के आणि 55 टक्के कमजोर झाले आहेत. दिलीप बिल्डकॉन कंपनीमधील किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 8 टक्के वरून वाढून 14 टक्केवर गेले आहे. त्याच वेळी झेन्सार टेक्नॉलॉजीज कंपनीमधील किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 14 टक्के वरून वाढून 29 टक्के पर्यंत पोहोचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Stock in Focus of experts where investor has got trapped and making loss on investment on 23 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x