 
						Stocks To Buy | पिरामल एंटरप्रायझेस, वेलस्पन इंडिया आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज सारख्या शेअरमध्ये मागील एका वर्षात अर्ध्यापेक्षा जास्त पडझड पाहायला मिळाली आहे. हे शेअर्स घसरण होऊन अर्ध्या किमतीवर आले आहेत. पिरामल एंटरप्रायझेस कंपनीचा स्टॉक 70 टक्क्यांपर्यंत खाली पडला आहे. झेन्सर टेक्नॉलॉजीज कंपनीचा स्टॉक 55 टक्क्यांहून अधिक गडगडला आहे. आणि वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली आहे.
एक वर्षभरापूर्वी NSE निर्देशांकावर पिरामल एंटरप्रायझेस कंपनीचा शेअर 2943.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वर्षभरात कमालीची घसरण झाली असून स्टॉक सध्या 822.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. झेन्सार टेक कंपनीचा स्टॉक 539 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात पडझड होऊन स्टॉक सध्या 227.15 रुपये किमतीवर आला आहे. वेलस्पन इंडिया कंपनीचा शेअर 170.70 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता 78.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
जर आपण या तीन कंपनीच्या शेअर्सचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, पिरामल कंपनीने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदरांचा 70.34 टक्के नुकसान केला आहे. गेल्या तीन महिन्यांत हा स्टॉक 51.87 टक्क्यांनी पडला आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2943.30 रुपये होती, सध्या स्टॉक आपल्या सर्वकलीन नीचांकी किंमत 817 रुपयेवर ट्रेड करत आहे. तज्ज्ञांना आता शेअरमध्ये खरेदीची जबरदस्त संधी दिसत असून बाजारातील मोठ्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे, वेलस्पन इंडिया कंपनीच्या स्टॉकने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 11.87 टक्के आणि एका महिन्यात 2 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गेल्या आठवड्यात शेअरमध्ये 7.34 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 170.70 रुपये आहे, आणि नीचांकी पातळी किंमत 62.20 रुपये होती. शेअर बाजारातील बऱ्याच तज्ञ आणि गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर बाय कॉल दिला असून स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये दीर्घकाळासाठी जोडण्याचा सल्ला दिला आहे.
झेन्सार टेक्नॉलॉजीज कंपनीची अवस्था वर्षभरापासून फार बिकट आहे. या स्टॉक मध्ये मागील एका वर्षात 55.29 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. मागील 3 महिन्यांत हा स्टॉक 15.78 टक्के पडला होता. गेल्या एका आठवड्याबद्दल या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 581.70 रुपये असून नीचांकी पातळी किंमत 63.80 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आणि तज्ञांनी या स्टॉकवर बाय रेटिंग दिली असुन स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		