18 May 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने 4600 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटमुळे स्वस्त खरेदी करता येणार

Multibagger Stocks

Multibagger Stocks | कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग व्यवसायात गुंतलेली मल्टीबॅगर स्टॉक कंपनी असून त्यांनी मागील महिन्यात शेअर धारकांना प्रति शेअर 0.75 रुपये अंतिम लाभांश वितरीत करण्याचे जाहीर केले होते. आता कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लि या स्मॉलकॅप कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीखही ठरवली आहे. ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग कंपनी 2:1 या प्रमाणात आपल्या स्टॉक विभाजित करणार आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर 590.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

स्टॉक स्प्लिट प्रमाण आणि रेकॉर्ड तारीख :
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार या कंपनीने इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख ठरवली आहे. कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 5 रुपयांच्या शेअर्स मध्ये विभाजित करणार आहे. कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी या वर्षात आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 710 टक्के परतावा कमावून दिला आहे. या पेट्रोलियम इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 22 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

कंपनीच्या शेअर्सनी दिलेला परतावा :
कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4,623 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 25 जून 2018 रोजी कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक या पेट्रोलियम इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 12.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 590.45 रुपये किमतीवर पोहोचले. या कंपनीच्या शेअर्सनी मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 1095 टक्के परतावा कमावून दिला होता. त्याच वेळी, कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यांत 291 टक्के वर गेले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Confidence Futuristic Energetech share price return on investment on 28 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x