 
						Loan Against Property | आपल्याला पैशांची तात्काळ गरज भासली आणि आपल्याकडे तेवढे पैसे नसतिल तर आपण आपल्याकडे असलेल्या वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवतो आणि कर्ज घेत असतो. याने त्या वेळी आपल्यावर असलेले आर्थिक संकट थोडे दूर करता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती तात्काळ पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबतात. अशात यात विविध गोष्टी गहाण ठेवसल्या जातात.
जर रक्कम छोटी असेल तर तुम्ही तुमचे सोने गहाण ठेवू शकता. तसेत गाडी किंवा घरावर देखील कर्ज मिळवता येते. आपल्या विविध गरजा असतात. त्यामुळे त्या नुसार वैयक्तीक कर्ज घेतले तर बॅंकेला त्यात रिस्क असते. त्यामुळे बॅंका सहसा हे कर्ज कोणालीही देत नाहीत. तसेच दिले तर त्यावर जास्त व्याज आकारले जाते.
मात्र तुम्ही एखाद्या वस्तूवर म्हणजे सोने, मालमत्ता, गाडी अशा गोष्टींवर कर्ज घेतले तर याचा फयदा होतो. यात तुम्हाला व्याजाचा दर कमी आकारला जातो. अशा पध्दतीचे कर्ज देत असताना तुमच्या त्या संपत्तीचे सर्व कागदपत्र बॅंकेत जमा करावे लागतात. यात तुमचा क्रेडिट स्कोर अशा गोष्टी तपासून घेतल्या जातात. जेव्हा असे कर्ज घेतले जाते तेव्हा अनेक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते.
व्याजदर तुलनात्मक पध्दतीने निवडा
प्रत्येक बॅंक असे कर्ज देत असताना त्याचा कालावधी, कर्जाची रक्कम, क्रेडिट स्कोर अशा विविध निकशांची पडताळणी करुण कर्ज देत असते. त्यामुळे प्रत्येक बॅंक या निकशांच्या आधारे वेगवेगळे व्याज दर आकारतात. तुम्ही जेव्हा कर्ज घेता तेव्हा ब-याच बॅंकांमध्ये याची चौकशी केली पाहिजे. जिथे कमीतकमी व्याज दर आहे ती बॅंक निवडावी.
कर्ज घेण्याची क्षमता
कर्ज घेत असताना तुमच्या मालमत्तेचे मुल्यांकन करा. यात तुम्हाला किती कर्ज हवे आहे, तुम्ही कशावर कर्ज घेत आहात, तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे, तुम्हाला भविष्यात आणखीन मोठे खर्च आहेत का, कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकता का? या सर्वांचे मुल्यांकन केल्यानंतरच तुम्ही कर्ज घ्या. अन्यथा हप्ते भरण्यास अडचणी आल्या तर तुमची मालमत्ता जप्त होईल.
प्रक्रिया शुल्क
कर्ज घेताना अतीरिक्त प्रक्रिया शुल्क तुम्हालाच द्यावे लागते. यात व्याजाच्या निकषांप्रमाने प्रत्येतक बॅंक वेगळा दर आकारते. त्यामुळे सगळीकडे याची चौकशी केल्यास तुम्हाला तुमच्या पैशांची बचत करण्यास फायदा होईल.
कालावधी
कर्जाचा कालावधी योग्य निवडावा लागतो. जर तुम्ही कमी कालावधी निवडला तर तुम्हाला जास्त ईएमआय आणि कमी व्याज भरावे लागते. तसेच जर जास्त कालावधी निवडला तर जास्त ईएमआय कमी पण व्याज वाढते. त्यामुळे याची माहिती घेउन कर्ज घ्या.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		