Rekha Jhunjhunwala Portfolio | टाटा तिथे नो घाटा! दिग्गज गुंतवणूकदारांनी 1 दिवसात या 3 शेअर्समधून अब्जो कमावले, हे शेअर्स नोट करा
Rekha Jhunjhunwala Portfolio | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सतत घसरण होत होती, मात्र शुक्रवारच्या प्रचंड तेजीमुळे त्यांना जबरदस्त नफा मिळाला आहे. मागील आठवड्यातील शेवटच्या काही दिवसात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मजबूत नफा कमावला. इतर गुंतवणूकदारांप्रमाणेच रेखा झुनझुनवाला यांनी देखील मजबूत नफा मिळवला. त्यांच्या निव्वळ संपत्तीत झालेली वाढ टाटा समूहाच्या टायटन कंपनी, टाटा मोटर्स, आणि इंडियन हॉटेल्स या तीन शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी तिन्ही शेअर्समधून एका दिवसात 240 कोटी रुपये कमाई केली आहे.
रेखा झुनझुनवाला यांची टायटन मधील गुंतवणूक :
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीतील टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 4,58,95,970 शेअर्स धारण केले आहेत. त्यांच्याकडे टायटन कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलपैकी 5.17 टक्के भाग भांडवल आहे. टायटन कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी 0.75 टक्के वाढीसह 2,414.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 41.05 रुपयेने वाढली होती. म्हणजे रेखा झुनझुनवाला यांना शुक्रवारी टायटन कंपनीच्या शेअरमधील वाढीमुळे 188.50 कोटी रुपये नफा मिळाला होता.
रेखा झुनझुनवाला यांची इंडियन हॉटेलमधील गुंतवणूक :
डिसेंबर 2022 तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स कंपनीचे 3,00,16,965 शेअर्स धारण केले आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे कंपनीचे एकूण 2.11 टक्के भाग भांडवल आहे. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 321.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमधील तेजीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये अंदाजे 11.55 कोटींची वाढ झाली आहे. म्हणजेच शुक्रवारी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स वाढल्यामुळे रेखा झुनझुनवाला यांना 240 कोटी रुपये फायदा झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rekha Jhunjhunwala Portfolio Tata group Share price check details on 06 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा