1 May 2025 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Loan EMI Alert | तुम्ही सुध्दा कर्ज घेताना ही चुक केली असेल तरी चिंता नको, या ट्रिकने कर्जाचं ओझं कमी होईल - Marathi News

Highlights:

  • Loan EMI Alert
  • जेवढं कर्ज हवं आहे तेवढेच कर्ज घेणे फायद्याचे
  • रि-फायनान्सची पद्धत वापरून पहा
  • कर्ज आणि बचत अशा पद्धतीने सेट करा
Loan EMI Alert

Loan EMI Alert | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी मोठं कर्ज घेतोच. लग्नखर्च, उच्च शिक्षणासाठी पैसे, सोबतच गृह कर्ज यांसारखे अनेक कर्ज माणूस घेत असतो. परंतु याच कर्जामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. बऱ्याच वेळा काही व्यक्ती आगाऊ कर्ज घेऊन फसतात. यामध्ये क्रेडिट कार्डचा वापर देखील तुम्हाला संकटात आणू शकतो. एखादा एजंट किंवा एखादी बँक तुम्हाला कर्जाच्या प्लॅन्स बद्दल सांगताना जास्त कालावधीच्या कर्जासाठी तुम्हाला कमी व्याजदर भरावे लागेल असं देखील सांगितलं जातं.

जेवढं कर्ज हवं आहे तेवढेच कर्ज घेणे फायद्याचे :
परंतु तुम्ही बाकीच्या ऑफरला दुर्लक्ष करून तुम्हाला जेवढं कर्ज हवं आहे तेवढेच कर्ज घेणे फायद्याचे ठरेल. कारण की तुम्ही आधीपासूनच एखाद्या कर्जाचा हफ्ता फेडत असाल आणि आणखीन कर्ज घेऊन डोक्यावर कर्जाचा डोंगर उभारत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्या डोक्यावरच्या कर्जाचा डोंब कशाप्रकारे कमी होऊ शकतो याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रि-फायनान्सची पद्धत वापरून पहा :
डोक्यावरून कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी तुम्ही री-फायनान्सची पद्धत अवलंबून स्वतःची मदत करू शकता. समजा यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलं असेल तर, तुम्ही हे कर्ज अगदी आरामशीर रूपांतरीत करू शकता. म्हणजेच क्रेडिट कार्ड कर्ज गृह कर्जामध्ये रूपांतरीत करून घेतलेलं कर्ज रद्द करू शकता. अशाप्रकारे महाग असलेल्या कर्जांना स्वस्त दरात रूपांतरित करून स्वतःच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवू शकता.

कर्ज आणि बचत अशा पद्धतीने सेट करा :
जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेण्याची चूक केली असेल तर, तुम्हाला खर्चाचे आणि बचतीचे पुरेपूर नियोजन आखावे लागेल. बचत, कर्ज, उत्पन्न आणि खर्चाचा व्यवस्थित ताळमेळ बसवावा लागेल. तुम्ही तयार केलेल्या यादीमध्ये एखाद्या कर्जावर किती टक्के व्याजदर आकारले जात आहे हे देखील मेन्शन करावे. म्हणजेच गृह कर्ज हे क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक खर्चापेक्षा कमी व्याजदर घेते. त्यामुळे शक्य होईल तेवढे लवकर कर्जाची पूर्तता करण्यावर लक्ष दिले पाहिजे.

तुम्ही आणखीन एका गोष्टीचा फायदा घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला ईएमआयच्या ओझ्यापासून सुटकारा मिळेल. तुम्ही प्री-पेमेंटचा पर्याय निवडून इएमआयचे ओझे टाळू शकता. ज्यामध्ये 65% व्याज वाचवून 10 % टक्क्यांनी इएमआय वाढवू शकता.

Latest Marathi News | Loan EMI Alert 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Loan EMI Alert(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या