11 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

Digikore Studios Share Price | बापरे! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी 57% परतावा देणारा डिजीकोर स्टुडिओ शेअर पुढे किती परतावा देईल?

Digikore Studios Share Price

Digikore Studios Share Price | डिजीकोर स्टुडिओ कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले आहेत. डिजीकोर स्टुडिओ IPO स्टॉक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 57 टक्के प्रीमियम वाढीसह 270 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये लागून 283.50 रुपये किमतीवर पोहचला होता.

डिजीकोर स्टुडिओ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 168-171 रुपये निश्चित केली होती आणि कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 800 शेअर्स ठेवले होते. गुंतवणूकदारांना या IPO मध्ये किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,36,800 रुपये जमा करावे लागले होते. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी डिजीकोर स्टुडिओ स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 269.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिजीकोर स्टुडिओ कंपनीचा IPO 25 ते 27 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. अवघ्या काही दिवसात हा IPO स्टॉक 281.58 पट अधिक खरेदी केला होता. त्याचवेळी ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. DigiCore स्टुडिओ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 30.48 कोटी रुपये जमा केले आहे.

ही सर्व रक्कम कंपनी खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे. त्याच वेळी यातील काही पैसे कंपनी सामान्य कॉर्पोरेट संबंधित कामावर देखील खर्च करणार आहे. डिजीकोर स्टुडिओ कंपनीने सारथी कॅपिटल अॅडव्हायझर्स फर्मला आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून जबाबदारी दिली होती. आणि बिगशेअर सर्व्हिसेसला IPO चे अधिकृत रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

डिजीकोर स्टुडिओ ही कंपनी 2000 साली स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः व्हिज्युअल इफेक्ट संबंधित काम करणारी स्टुडिओ कंपनी आहे. डिजीकोर स्टुडिओ कंपनी चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही मालिका, माहितीपट, जाहिरातींसाठी व्हिज्युअल इफेक्ट म्हणजेच VFX सेवा प्रदान करण्याचे काम करते. डिजीकोर ही भारतातील काही नावाजलेल्या दिग्गज स्टुडिओ कंपनीपैकी एक मानली जाते.

या कंपनीचे ऑडिट TPN सारख्या नामांकित संस्थाद्वारे केले गेले आहे. डिजीकोर स्टुडिओ ही VFX कंपनी Disney, Marvel, Netflix, Amazon, Apple, Paramount, Warner Bros आणि Lions Gate यासारख्या परकीय कंपन्यांना आपल्या सेवा प्रदान करते.

जून तिमाहीपर्यंत कंपनीची आर्थिक स्थिती :
महसूल : 1,186.49 लाख रुपये
नेटवर्थ : 813.30 लाख रुपये
राखीव आणि अधिशेष : 912.25 लाख रुपये
नफा : 270.89 लाख रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Digikore Studios Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Digikore Studios Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x