17 May 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आजही सोन्याचे भाव जोरदार घसरले, अशी संधी पुन्हा येणार नाही, किती स्वस्त झालं सोनं तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात झपाट्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे सोन्यावर प्रचंड दबाव आहे. अशावेळी तुमच्या ही मनात प्रश्न असेल की, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे की नाही? नवरात्रीपासून सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात सोन्या-चांदीची मागणी वाढते. दिवाळी आणि धनतेरसच्या निमित्ताने भारतात सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 56561 रुपयांवर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 56653 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

सध्या सोन्याचा भाव उच्चांक पातळीवरून 5,024 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके स्वस्त झाले आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. त्यामुळे आज सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ९२ रुपयांची घसरण झाली आहे.

आज चांदीचा भाव 67,417 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 67446 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात किलोमागे २९ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 9047 रुपयांवर पोहोचली आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

सोन्याची नाणी ज्वेलर्स, बँका, एनबीएफसी आणि ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी केली जाऊ शकतात. सोन्याची नाणी २४ कॅरेट शुद्धता आणि ९९९ शुद्धतेची असावीत. ते विकत घेताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण केवळ पॅकिंग नाणी खरेदी करावीत. त्यांच्या पॅकेजिंगमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. बाजारात ०.५ ग्रॅम ते ५० ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी उपलब्ध आहेत.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर:
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 52400, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 52430 रुपये, 24 कॅरेट सोने : 57190 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 52400, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : 52430 रुपये, २४ कॅरेट सोने : 57190 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 52400, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 52400, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 52430 रुपये, 24 कॅरेट सोने : 57190 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 52400, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 52400, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 52400 रुपये, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Update check details on 05 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x