
Loan Repayment | सध्याच्या युगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याने कधी कर्ज घेतले नाही. अगदी साधा मोबाईल फोन घेताना देखील अनेक व्यक्ती ईएमआयवर घेत असतात. तसेच घर खरेदीसाठी सर्वसामन्य माणसे हमखास गृह कर्ज घेतात. माणसाच्या गरजा एवढ्या वाढल्या आहेत की त्या पूर्ण करण्यासाठी त्यांची कमाई रक्कम अपूरी पडते. त्यामुळेत घर, गाडी, दुकान, जमिनी अशा मालमत्ता व्यक्ती कर्ज घेउन खरेदी करतात. मात्र कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यस कर्जाची परतफेड नेमकी कशी केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? आज याच विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
कोण़तेही कर्ज घेत असताना त्या व्यक्तीला बॅंकेला हमी द्यावी लागते. मग ते गृह कर्ज असो अथवा कार लोन. त्यावर हमी द्यावी लागते. जेव्हा बॅंक कर्ज देत असते तेव्हा या सर्व गोष्टी विचारात घेउन कर्जासाठी मंजूरी देते. तसेच सह कर्जदाराची देखील स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे मुख्य कर्जदाराचा मृत्यू झाल्यावर बॅंक आधी त्याच्या सह कर्जदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.
जर सह कर्जदाराशी कोणताही संपर्क होत नसेल अथवा तो हे कर्ज भरण्यास तयार नसेल तर बॅंक मृत व्यक्तीच्या कुटूंबीयांकडून कर्ज वसूल करते. यात वारसदार अथवा कुटूंबीय कर्ज भरण्यास नकार देत असतील तर पुढे कर्जाची परतफेड करण्यासाठी ती मालमत्ता, जमिन आपल्या ताब्यात घेते. अशात जर एखादी व्यक्ती मृत व्यक्तीचा वारसदार असल्याचे सांगून कर्ज फेजण्यास तयार असेल तर ती मालमत्ता लिलावात जाण्यापासून वाचते.
घरा प्रमाणेच जर कारसाठी कर्ज घेतले असेल आणि कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसदारांना कर्ज भरण्चायास विचारणा केली जाते. त्यांनी नकार दिल्यास बॅंक कारचा ताबा घेउन कर्ज फेडण्यासाठी तिचा लिलाव करते.
वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत मात्र असे होत नाही. कारण हे कर्ज कोणत्याही हमी शिवाय घेतलेले असते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित मानले जाते. यात जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर त्याची परतफेड करण्यास बॅंक मृत व्यक्तीचे वारसदार किंवा कुटूंबीय यांना उर्वरित रक्कम भरण्यास सांगू शकत नाही. वैयक्तिक कर्जात कोणतीच वस्तू गहाण ठेवलेली नसते.
आता वैयक्तिक कर्जामुळे बॅंकेचे नुकसान होते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असे कधीच होत नाही. सह कर्जदाराचा एथे पर्याय असतो. त्यामुळे बॅंक त्याच्याकडून परतफेड करून घेऊ शकते. तसेच जर सह कर्जदार नसेल तर वैयक्तिक कर्ज घेणा-या व्यक्तीचा विमा काढलेला असतो. यात विमा पॉलिसेचे पैसे ज्याच्या नावावर विमा आहे त्यानेच भरणे बंधनकारक असते. त्यामुळे अशा परिस्थीत बॅंक विमा कंपनी कडून कर्जाची परतफेड करून घेते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.