CIBIL Score | अरेरे! कोणतीच बॅंक तुम्हाला कर्ज द्यायला तयार नाही?, कारण येथे आहे, ही बातमी नक्की वाचा

CIBIL Score | काही वस्तू खरेदी करताना अनेक व्यक्ती बॅंकेकडून कर्ज घेतात. मात्र बॅंकेकडून कर्ज मिळवणे सोपी गोष्ट नाही. यात अनेक गोष्टींची शहानिशा झाल्यावर बॅंक कर्ज देत असते. अशात अनेक व्यक्तींना कर्ज मिळत नाही. अनेक बॅंकांच्या चक्रामारुन देखील बॅंक कर्ज देत नाही त्यावेळी याची अनेक कारणे असू शकतात. मात्र यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमचा CIBILL स्कोअर. CIBILL स्कोअर चांगला नसल्यास कोणतीच बॅंक कर्ज देत नाही.
जर तुम्हाला तातडीने कर्ज घेण्याची खूप गरज आहे मात्र तुमचा CIBILL स्कोअर चांगला नाही तर बॅंक कर्ज देत नाही. अशात आजही अनेक व्याक्तींना CIBILL स्कोअर नेमकं काय आहे. तसेच तो चांगला कसा ठेवाव हे माहीत नाही. त्यामुळे आज या बातमीतून CIBILL स्कोअर विषयी आणि तो चांगला ठेवून कर्ज मिळवताना येणा-या अडचणी कशा सोडवायच्या या विषयी जाणून घेऊ.
ईएमआय
CIBILL स्कोअर बिघडण्यात तुमचा ईएमआय मोठे कारण ठरू शकतो. जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड करताना तुम्ही ईएमआय वेळेत भरला नसेल, तर तुमचा CIBILL स्कोअर खराब होतो. तसेच जर तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्याचे बिल थकवले असेल तर याचा देखील CIBILL स्कोअरवर परिणाम होतो. तुम्ही थकवलेले पैसे नंतर व्याजासकट भरले असतील तरी CIBILL स्कोअरवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ईएमआय वेळेत भरावा.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्ही एक प्रकारे कर्जच घेतलेले असते. त्यामुळे हे कर्जाचे पैसे आहेत असे लक्षात ठेवून ते वापरा. अधीक गरज भासल्यावरच त्याचा वापर करा. जर चैन पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला त्याने नुकसान होऊ शकते. क्रेडिट कार्डमधून बिल भरताना काळजीपूर्वक ते वापरा. कारण सध्या त्यातील पैसे तुमचे असले तरी नंतर तुम्हाला त्याचे बिल भरावे लागते. जर त्याचा वापर तुम्ही कोणत्याही मर्यादा न बाळगता केला तर बिल भरण्यास जास्त रक्कम अंगावर पडते. क्रेडिट कार्डचे पैसे वेळेत न भरल्याने देखील तुमचा CIBILL स्कोअर खराब होतो.
या दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचा CIBILL स्कोअर निट ठेवण्यासाठी पुढील बाबी विचारात घ्या
* जास्त गरज असेल तरच कर्ज घ्या.
* कर्ज घेण्याची गरज पडू नये म्हणून आधीच सेवींगला सुरूवात करा.
* लग्न, घर, गाडी अशा गोष्टी कर्ज घेउन करत असाल तर त्याचे भान ठेवा.
* घेतलेले कर्ज वेळेत पूर्ण करा.
* उधळपट्टी म्हणून क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आजच तसे करणे टाळा.
* आपल्या डोक्यावरील कर्ज पूर्ण झाल्यावर चैनीच्या गोष्टींचा विचार करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CIBIL score to improve your credit rating check details 14 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकमध्ये तेजी, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: IDEA
-
BEL Share Price | ऑर्डरबुक मजबूत असलेल्या या कंपनीचा शेअर खरेदी करा, संयमातून मोठा परतावा मिळेल - NSE: BEL
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Jio Finance Share Price | हीच खरेदीची संधी, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN