Lorenzini Apparels Share Price | 4 रुपयाच्या शेअरने करोडपती केलं, आता फ्री बोनस शेअर्स वाटप होणार, संधीचा लाभ घ्या

Lorenzini Apparels Share Price | लॉरेन्झिनी ॲपेरेल्स या गारमेंट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 4 वर्षांत लॉरेन्झिनी ॲपेरल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 4 रुपयेवरून वाढून 375 रुपये किमतीवर पोहचली होती. ( लॉरेन्झिनी ॲपेरेल्स कंपनी अंश )

आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 508 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 82.60 रुपये होती. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी लॉरेन्झिनी ॲपेरेल्स स्टॉक 1.76 टक्के घसरणीसह 377 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

लॉरेन्झिनी ॲपेरेल्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 6:11 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना प्रत्येक 11 शेअर्सवर 6 बोनस शेअर्स मोफत मिळणार आहे. याशिवाय कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 28 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.

29 मे 2020 रोजी लॉरेन्झिनी ॲपेरेल्स कंपनीचे शेअर्स 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 375.85 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 29 मे 2020 रोजी लॉरेन्झिनी ॲपेरेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.04 कोटी रुपये झाले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 90 रुपयेवरून वाढून 375.85 रुपये किमतीवर पोहचली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lorenzini Apparels Share Price NSE Live 16 March 2024.