2 May 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर केपीआय ग्रीन शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड कंपनीने नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यानंतर हा स्टॉक शुक्रवारी 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. मात्र दिवसा अखेर प्रॉफिट बुकींगमुळे शेअर्स रेड झोनमध्ये क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 2.35 टक्के घसरणीसह 1,454 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांना 16.80 मेगावॅट पवन ऊर्जा निर्मितीचे आणि 50 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एलओआय जारी करण्यात आले आहे. ही निविदा 500 मेगावॅट ग्रीन एनर्जी पर्यायासह 500 मेगावॅट हायब्रीड अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या निर्मितीसाठी जारी करण्यात आली होती. गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबतचा वीज खरेदी करार गुजरात वीज नियामक आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलात आणला जाईल.

2024 या वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 384 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 847 टक्के वाढली आहे.

26 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1895.95 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 29 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 259.16 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने डिसेंबर तिमाहीत 46.87 टक्के वाढीसह 50.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 84.20 टक्के वाढीसह 330.11 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. केपीआय ग्रीन एनर्जी ही कंपनी मुख्यतः सौर ऊर्जा निर्मितीचा व्यवसाय करते. ही कंपनी ‘सोलरिझम’ या ब्रँड नावाखाली स्वतंत्र ऊर्जा उत्पादक आणि कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर सेवा प्रदाता म्हणून सौर ऊर्जाद्वारे निर्मित वीज पुरवठा करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 16 March 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x