
Lotus Chocolate Company Share Price | आज या लेखात आपण अशा स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. हा स्टॉक आहे, ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचा. मागील एका महिनाभरापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हिट करत आहेत. लोटस चॉकलेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यापासून सतत 5 टक्के अप्पर सर्किट तोडत आहेत. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी ‘लोटस चॉकलेट कंपनी’ चे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 457.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)
‘लोटस चॉकलेट कंपनी’ च्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 96 रुपयेवरून वाढून 435.85 रुपयेवर गेली आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी ‘लोटस चॉकलेट कंपनी’ चे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 457.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. लोटस चॉकलेट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 355 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात जर तुम्ही लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते ते, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.54 लाख रुपये झाले असते.
कंपनीच्या शेअर्समधील वाढीचे कारण :
मुकेश अंबानींनी ‘लोटस चॉकलेट’ कंपनीमधील बहुसंख्य भाग भांडवल खरेदी केले आहेत. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड यांनी लोटस चॉकलेटमधील अतिरिक्त 26 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ओपन ऑफरची घोषणा केली होती. ही ओपन ऑफर 21 फेब्रुवारी 2023 रोजी ते 6 मार्च 2023 रोजी पर्यंत सुरू राहील. ओपन ऑफर अंतर्गत रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड 115.50 रुपये किमतीवर शेअर्स खरेदी करतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.