
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीला पश्चिम आशियामध्ये 15,000 कोटींपेक्षा जास्त मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने 15,000 कोटींपेक्षा जास्त मूल्याचे प्रकल्प ‘लार्ज’ श्रेणीत विभागले आहेत. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बातमी येताच लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती.
त्यानंतर शेअरची किंमत 2,918.90 रुपये किमतीवर पोहचली होती. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.97 टक्के घसरणीसह 2,900.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लार्सन अँड टुब्रोने दिलेल्या माहिती नुसार, “लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या L&T Energy Hydrocarbons कंपनीला पश्चिम आशियातील एका प्रतिष्ठित ग्राहकाकडून एक ‘अल्ट्रा-मेगा’ प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीला इरादा पत्र देखील प्रदान करण्यात आले आहे. लार्सन अँड टुब्रो ही कंपनी 23 बिलियन डॉलर्स बाजार भांडवल असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील विविध 50 पेक्षा जास्त देशांमध्ये सक्रिय व्यवसाय करत आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीला मागील काही वर्षात सातत्याने मोठ्या ऑर्डर मिळल्या आहेत. 2023-24 मधील चालू तिमाहीत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या उत्पादन युनिटला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून अनेक मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या वर्गीकरणानुसार 2,500 कोटी ते 5,000 कोटींपर्यंतचे कॉन्ट्रॅक्ट मोठ्या ऑर्डरच्या श्रेणीत सामील केले जातात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.