
Man Industries Share Price | मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 400 कोटी रुपये मूल्याची एक नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे.
ऑर्डरची बातमी शेअर बाजारात पसरताच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅन इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 196.40 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तर दिवसा अखेर मॅन इंडस्ट्रीज स्टॉक 4.28 टक्के वाढीसह 194.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी मॅन इंडस्ट्रीज स्टॉक 3.26 टक्के घसरणीसह 188.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील
मॅन इंडस्ट्रीज कंपनी मुख्यतः पाईप्स बनवण्याचे काम करते. नुकताच मॅन इंडस्ट्रीज कंपनीला विविध घरगुती ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स बावण्याचे काम मिळाले आहे. सध्या या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1600 कोटी रुपये आहे. पुढील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मजबूत ऑर्डर बुकमुळे गुंतवणुकदार या कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत.
जून तिमाही कामगिरी
मॅन इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना 1988 साली करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः तेल आणि वायू उद्योग, पेट्रोकेमिकल्स पाणी, खते इत्यादी उद्योगांसाठी पाईप बनवण्याचे काम करते. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत मॅन इंडस्ट्रीज कंपनीने 11.88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 13 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 4.58 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.