
Man Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 256.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 247.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीला 380 कोटी रुपये मूल्याचे नवीन काम मिळाले आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला विविध प्रकारच्या पाईप्सचा पुरवठा करायचे काम देण्यात आले आहे.
मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहिती नुसार, कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर बुकचा आकार 1400 कोटी रुपये आहे. नुकताच कंपनीला विविध प्रकारच्या पाईप्सचा पुरवठा करण्यासाठी 400 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. मॅन इंडस्ट्रीज इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीने 11.88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीने 10.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.