Man Infra Share Price | कमाल झाली! मॅन इन्फ्रा शेअरने 2 दिवसात दिला 17 टक्के परतावा, पुढे मल्टिबॅगर होईल

Man Infra Share Price | मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. गुरुवारी मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह 181 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इक्विटी शेअर्स, परिवर्तनीय सिक्युरिटीज, वॉरंट किंवा डेट सिक्युरिटीजच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे.

मागील आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअरने 35 टक्क्यांच्या घसरणीनंतर पुन्हा रिकव्हरी केली आहे. एप्रिल 2023 या महिन्यात मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन स्टॉक 20 टक्के वाढला होता. मागील सहा महिन्यांत मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. सध्या हा शेअर 2.28% वाढीसह 182 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात मॅन इन्फ्रा स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 17.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन स्टॉक 9.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीच्या तुलनेत हा स्टॉक आता 1813 टक्क्यांनी वाढला आहे.

मागील सहा महिन्यांत मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन ही कंपनी मुख्यतः एकात्मिक EPC, अभियांत्रिकी , खरेदी आणि बांधकाम संबंधित व्यवसाय करते. मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनी संपूर्ण भारतात बंदर, निवासी प्रकल्प, व्यावसायिक, औद्योगिक आणि रस्ते बांधकाम क्षेत्रात आपल्या सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Man Infra Share Price NSE 24 November 2023.