 
						Manappuram Share Price | मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स सध्या 150 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तथापि तज्ञांनी शेअरमधील घसरण गुंतवणूकीची संधी म्हणून पाहिली पाहिजे असे मत मांडले आहे.
तज्ञांच्या मते मणप्पुरम फायनान्स स्टॉक सध्याच्या किमतीवरून 9 टक्क्यांनी वाढू शकतो. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के घसरणीसह 164.75 रुपये रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी मणप्पुरम फायनान्स स्टॉक 0.18 टक्के घसरणीसह 164.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
8 डिसेंबर 2006 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 90 पैशांवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 164.75 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या लोकांनी 17 वर्षांपूर्वी मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये 55000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत.
27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 101.15 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 4 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 68 टक्क्यांनी वाढून 170.50 रुपये या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. मात्र मागील काही दिवसापासून शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाल्याने शेअरची किंमत 3 टक्क्यांनी घसरली आहे.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने मणप्पुरम फायनान्स कंपनीचा EPS अंदाज आर्थिक वर्ष 2024 साठी 5 टक्क्यांनी वाढवला आहे. आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीचा EPS अंदाज 6 टक्क्यांनी वाढवला आहे. तज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2023-26 दरम्यान मणप्पुरम फायनान्स कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 27 टक्के CAGR दराने वाढू शकतो. ब्रोकरेजच्या मते मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 180 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून त्यांनी गुंतवणुकदारांना स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		