
Mankind Pharma Share Prices | नुकताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. मात्र अवघ्या दोनच दिवसांनी कंपनीबद्दल वाईट बातमी आली आहे. आयकर विभागाने ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या दिल्ली स्थित कार्यालयावर छापा मारण्यात आला आहे.
गुरुवारी आयटी विभागाच्या छाप्याची बातमी येताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स 5.5 टक्के घसरले होते. मॅनकाइंड फार्मा आणि आयटी विभागाने अद्याप या छाप्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स 2.63 टक्के वाढीसह 1,416.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले. या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या जबरदस्त वाढीमुळे कंपनीचे बाजार मूल्य 32 टक्के वाढीसह 6.97 अब्ज डॉलर्सवर पोहचले आहे. 1995 मध्ये स्थापन झालेली मॅनकाइंड फार्मा ही कंपनी मॅनफोर्स कंडोम, गर्भधारणा चाचणी किट प्रीगा न्यूज, यासारखे वस्तू बनवण्याचे काम करते.
या कंपनीचे संस्थापक रमेश जुनेजा आहेत. मॅनकाइंड फार्मा कंपनीचे संपूर्ण लक्ष देशांतर्गत बाजारावर केंद्रित आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या आकडेवारीनुसार, ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या एकूण महसुलात देशांतर्गत व्यापारातून 97.60 टक्के महसूल येतो. या कंपनीने फार्मास्युटिकल्स व्यवसायात 36 प्रसिद्ध ब्रँड बनवले आहेत.
‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स 1080 रुपये या IPO किंमतीच्या तुलनेत 20 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक 32 टक्क्यांच्या वाढीसह 1424.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या शरास स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 345 रुपये प्रति शेअर नफा कमावून दिला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.