
Mayur Uniquoters Share Price | मयूर युनिकोटर्स या सिंथेटिक लेदर मेकर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अडीच टक्क्यांनी घसरले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकवर 72 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता अनेक पट गुणाकार झाले आहेत.
काही ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरमधील घसरण गुंतवणूकीची संधी म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी मयूर युनिकोटर्स स्टॉक 0.71 टक्के वाढीसह 563.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, मयूर युनिकोटर्स स्टॉक पुढील काळात 27 टक्के वाढू शकतो. सध्या या कंपनीचे शेअर्स 563 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 552.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 3 ऑक्टोबर 2008 रोजी मयुर युनिकोटर्स कंपनीचे शेअर्स 3.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 15 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13952 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 72 हजार रुपये लावले होते, ते लोक आता अक्षरशः करोडपती झाले आहेत. 26 डिसेंबर 2022 रोजी मयूर युनिकोटर्स स्टॉक 382.40 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
अवघ्या 8 महिन्यांत या स्टॉकने लोकांना 52 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 583.60 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता.
मयूर युनिकोटर्स ही कंपनी मुख्यतः ऑटो सेक्टर, पादत्राणे आणि पोशाख उद्योगांना लागणारे सिंथेटिक लेदर बनवण्याचे काम करते. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 50-60 टक्के विक्री ऑटोमोटिव्ह सेक्टरला होते. 20-30 टक्के फुटवेअर विभागाला होते. मयूर युनिकोटर्स ही कंपनी मर्सिडीज आणि BMW सारख्या ग्लोबल लक्झरी कार कंपन्यांना आपली उत्पादने पुरवठा करते.
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने कंपनीच्या ऑटो स्पेस व्यवसायात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीची व्यापारी वाढ पाहून शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 700 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.