
Mazagon Dock Share Price | माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये काल बंपर तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी हा स्टॉक 7 टक्के वाढीसह 1,341 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज माझागाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे.
आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 1,283.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1342 रुपये होती.
स्टॉकवाढीचे कारण
माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक तेजी एक मोठे कंत्राट मिळाल्याने पाहायला मिळाली होती. भारतीय संरक्षण मंत्रालयाने माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीला 2725 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे. हा करार आयएनएस शंकुश या पाणबुडीच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात आला आहे. शंकुश ही भारतीय संरक्षण दलातील सब-सरफेस किलर श्रेणीची पाणबुडी आहे. जीर्णोद्धार झाल्यानंतर ही पाणबुडी सेवा देण्यास सज्ज असेल. यानंतर ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या सक्रिय ताफ्यात सामील केली जाईल.
गुंतवणूकीवर परतावा
मागील 1 वर्षात माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 407.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पट वाढवले आहे. माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2022 रोजी 255.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल 3 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर 1341 रुपये किमतीवर पोहचले होते. त्याच वेळी 2023 या वर्षात माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअरने लोकांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.