
मुंबई, 06 डिसेंबर | शेअर बाजारातील गेल्या आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारच्या कामगिरीने 3 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अस्थिरतेमध्ये एक टक्का वाढीसह आठवड्याचे व्यवहार बंद झाले. गुंतवणूकदार आणि व्यापारी समोर आलेल्या कोविडच्या नव्या प्रकारावर म्हणजे ओमिक्रॉनवर बारीक लक्ष ठेवून आहेत. परिणामी जागतिक स्तरावर बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र तेलाच्या किमतीतील घसरण, आर्थिक वर्ष 22 मधील Q2 मधील चांगली GDP वाढ आणि PMI उत्पादनातील कल यांनी इक्विटी मार्केटला पाठिंबा दिला.
MBL Infrastructures Ltd stock of this company rose from Rs 21.85 to Rs 31.40. In this way, investors got a return of 43.7 percent from the shares of the company :
मागील आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 589.31 अंकांनी वाढून 57,696.46 वर आणि निफ्टी 50 170.25 अंकांनी वाढून 17,196.70 वर पोहोचला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 1.35 टक्के आणि 1.25 टक्क्यांनी वाढले. मात्र दुसरीकडे या कालावधीत एक स्टॉक असा होता ज्यांने गुंतवणूकदारांना 43.7 टक्क्यांपर्यंत परतावा दिला. त्या शेअर बद्दल जाणून घ्या.
एमबीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड:
एमबीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. या कंपनीचा शेअर 21.85 रुपयांवरून 31.40 रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअर्समधून 43.7 टक्के परतावा मिळाला. या कंपनीचे मार्केट कॅप 328.93 कोटी रुपये आहे. 5 दिवसात 43.7 टक्के परतावा हा FD सारख्या पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आणि चांगला आहे. शुक्रवारी हा शेअर सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह 31.40 रुपयांवर बंद झाला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.