25 April 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली
x

MCON Rasayan IPO | या कंपनीच्या IPO ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक धमाल करतोय

MCON Rasayan IPO

MCON Rasayan IPO | ‘एमकॉन रसायन’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ‘एमकॉन रसायन’ कंपनीचा IPO आतपर्यंत एकूण 384.64 पट सबस्क्राईब झाला आहे. ‘एमकॉन रसायन’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 453.41 पट सबस्क्राइब झाला आहे. तर इतर श्रेण्यांसाठी राखीव ठेवलेला कोटा 307.09 पट सबस्क्राईब झाला आहे. ‘एमकॉन रसायन’ कंपनीचा IPO 6 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 10 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. कंपनीने आपल्या IPO किमत बँड 40 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. ‘एमकॉन रसायन’ कंपनीच्या आयपीओ स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

‘एमकॉन रसायन’ GMP :
‘एमकॉन रसायन’ कंपनीचा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये प्रीमियम किमतीवर पोहोचला होता. मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘एमकॉन रसायन’ कंपनीच्या IPO सध्या ये मार्केटमध्ये 25 रुपयांवर आहे, आणि कंपनीच्या शेअर्सची किंमत प्रति शेअर 40 रुपये आहे. जर हा स्टॉक या GMP वर स्थिर राहिला तर स्टॉक 65 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ‘एमकॉन रसायन’ कंपनीचे शेअर्स 20 मार्च 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी ‘एमकॉन रसायन’ कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले आहेत, त्यांना पहिल्याच 50 टक्के लिस्टिंग प्रॉफिट मिळू शकतो.

कंपनीचे IPO तपशील :
‘एमकॉन रसायन’ कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 40 रुपये निश्चित करण्यात आली होती. किरकोळ गुंतवणूकदार IPO मध्ये 1 लॉटसाठी अर्ज करू शकत होते. कंपनीने 1 लॉटमध्ये 3000 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना IPO मध्ये एक लॉट घेण्यासाठी किमान 1.2 लाख रुपये जमा करावे लागले. ‘एमकॉन रसायन’ कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे 91.45 टक्के शेअर्स आहेत. शेअर्सच्या लिस्टनंतर कंपनीच्या प्रवर्तकांचा वाटा 66.64 टक्के पर्यंत खाली येईल. ‘एमकॉन रसायन’ कंपनी मुख्यतः आधुनिक बांधकाम साहित्य, बांधकाम रसायनांचे उत्पादन, विपणन तसेच विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MCON Rasayan IPO is ready to get listed on stock market details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

MCON Rasayan IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x