15 December 2024 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Global Surface IPO | IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, ग्रे मार्केटमध्ये शेअर्स 45 रुपये प्रीमियम किमतीवर, मजबूत नफ्याचे संकेत

Global Surface IPO

Global Surface IPO | सध्या शेअर बजार खूप अस्थिर आहे. कमाई करण्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध आहेत. गुंतवणुकदार मात्र IPO मध्ये पैसे लावून कमाई करु शकतात. सध्या जर तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘ग्लोबल सरफेस लिमिटेड’ कंपनीचा IPO 13 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 15 मार्च 2023 रोजी बंद होईल. या IPO मध्ये गुंतवणुकीसाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊ ग्रे मार्केटमध्ये कंपनीची कामगिरी कशी आहे?

ग्रे मार्केटमध्ये कंपनीची कामगिरी :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, ‘ग्लोबल सरफेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 45 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर स्टॉक ही किंमत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला, तर या कंपनीचे शेअर्स 185 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ‘ग्लोबल सरफेस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO साठी 133-140 रुपये किंमत बँड निश्चित केला आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ‘ग्लोबल सरफेस लिमिटेड’ कंपनीने 198 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यापैकी कंपनीचा PAT 35 कोटी रुपये होता. त्याचवेळी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 99 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ज्यामध्ये कंपनीचा PAT 13.60 कोटी रुपये होता. ‘ग्लोबल सरफेस लिमिटेड’ कंपनी आपल्या IPO द्वारे 155 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Surface IPO is open for investment check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

Global Surface IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x