
Meson Valves India IPO | सध्या शेअर बाजारात मेसन वाल्व्ह इंडिया या स्मॉलकॅप कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मेसन वाल्व्ह इंडिया सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी अशी की, या कंपनीचा आयपीओ पहिल्याच दिवशी फुल्ल सबस्क्राईब झाला आहे.
IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशी मेसन वाल्व्ह इंडिया कंपनीचा IPO 8.33 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. मेसन वाल्व्ह इंडिया कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 14.53 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.11 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
मेसन वाल्व्ह इंडिया कंपनीचा IPO स्टॉक तुम्हाला लिस्टिंगच्या दिवशी 88 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून देऊ शकतो. मेसन वाल्व्ह IPO स्टॉकची किंमत बँड 102 रुपये आहे. मेसन वाल्व्ह आयपीओ स्टॉक बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाणार आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते मेसन वाल्व्ह इंडिया कंपनीचे IPO शेअर्स 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किंमत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला, तर शेअर 192 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
जे गुंतवणूकदार या IPO मध्ये पैसे लावतील त्यांना पहिल्याच दिवशी 88 टक्के पेक्षा जास्त नफा मिळेल. या कंपनीचे शेअर्स 21 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाणार आहे. मेसन वाल्व्ह कंपनीचा IPO 12 सप्टेंबर 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील.
15 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकदारांना शेअर वाटप केले जाईल आणि 21 सप्टेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर सूचीबद्ध केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार मेसन वाल्व्ह IPO मध्ये किमान 1 लॉटवर पैसे लावू शकतात. एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना 1200 शेअर्स मिळतील. आणि त्यासाठी गुंतवणूकदारांना 122400 रुपये जमा करावे लागतील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.