
Mishtann Foods share Price | मागील एका महिन्यापासून मिष्टान्न फूड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात मिष्टान्न फूड कंपनीच्या शेअरची किंमत 7.25 रुपये किमतीवरून 12.08 रुपये किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 40 टक्के परतवा कमावला आहे. मिष्टान्न फूड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 12.38 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ पोहचला आहे.
मागील सहा महिन्यापासून मिष्टान्न फूड या स्मॉल कॅप पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.03 टक्के वाढीसह 12.08 रुपये किमतीवर (सकाळी 10:25 पर्यंत) ट्रेड करत आहेत. (Mishtann Foods Share Price BSE)
मिष्टान्न फूड कंपनीमध्ये नोमुरा सिंगापूर फर्मने मोठी गुंतवणूक केली आहे. लेटेस्ट स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार नोमुरा सिंगापूर फर्मने मिष्टान्न फूड कंपनीचे 1,28,25,854 शेअर्स खरेदी केले आहेत. हे भाग भांडवल कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.28 टक्के आहे. FY23 च्या Q4 मधील मिश्तान फूड्स कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार, मिष्टान्न फूड कंपनीमध्ये 1 टक्क्यांपेक्षा अधिक भाग भांडवल असलेल्या FII च्या यादीमध्ये नोमुरा सिंगापूर फर्मचे नाव नव्हते.
याचा अर्थ, नोमुरा सिंगापूर फर्मने Q4 FY23 संपल्यानंतर मिष्टान्न फूड कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. तथापि, या FII ने Q1 FY2024 मध्ये सर्व शेअर्स खरेदी केले होते की नाही, किंवा कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 1 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते की नाही, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.
मिष्टान्न फूड कंपनीचे शेअर्स आज देखील हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. आज या कंपनीच्या शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर पाहायला मिळत आहेत. मिष्टान्न फूड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 953 कोटी रुपये आहे. मिष्टान्न फूड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11.80 रुपये होती. तर 52-आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.09 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 33.79 टक्के वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.