
MMTC Share Price | मागील 2 दिवसांपासून एमएमटीसी कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळत होता. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमएमटीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 57.06 रुपये किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी एमएमटीसी कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के घसरणीसह 53.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 6 महिन्यांत एमएमटीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 101.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एमएमटीसी कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीत कळवले होते की, एमएमटीसी कंपनीची उपकंपनी असलेल्या एमटीपीएल सिंगापूर कंपनीला सिंगापूर उच्च न्यायालयाने सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या अंतिम आदेशाची प्रत कंपनीला मिळाली नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
एमएमटीसी ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 15 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. मात्र कंपनीने अद्याप लाभांशाचे प्रमाण जाहीर केलेले नाही. एमएमटीसी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 22 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते पुढील काळात एमएमटीसी कंपनीचे शेअर्स 66 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या स्टॉकमध्ये 58 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. एमएमटीसी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिजांचा व्यापार करणारी कंपनी आहे. या कंपनीत भारत सरकारने 89.93 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.