
Mold-Tek Packaging Share Price | ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 मे 2013 रोजी ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीचे शेअर्स 18.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 984.25 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते.
‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. कंपनीने मार्च तिमाहीत वर्ष दर वर्ष 32.79 टक्के वाढ नोंदवली आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के वाढीसह 970.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज फर्मने ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकवर 1,110 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 15 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटल मार्केट्स कंपनीने ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीच्या शेअरवर 1,252 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
‘मोल्ड टेक पॅकेजिंग’ कंपनीने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 197.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 37.56 टक्के नफा मिळाला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे, मागील महिन्यात कंपनीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1110 रुपये होती. तर आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 648.15 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.