
Money From Shares | शेअर बाजारात संशोधन करणाऱ्या दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. यावेळी जेएम फायनान्शियल आणि शेअरखान यांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, आज आपण या लेखात या शेअर्सचे तपशील पाहणार आहोत. तज्ञांनी या स्टॉक बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स 2023 मध्ये चांगली कमाई करून देऊ शकतात असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
Wonderla Holidays Ltd : (Wonderla Holidays Share Price)
आज या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 336 रुकये किमतीवर क्लोज झाला आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 198.00 रुपये होती. तर या स्टॉकची उच्चांक किंमत पातळी 455.90 रुपये होती. पुढील एका वर्षात हा स्टॉक 425 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. रिसर्च आणि ब्रोकरेज कंपनी शेअरखानने या स्टॉकसाठी 425 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
पूनावाला फिनकॉर्प : (Poonawalla Fincorp Share Price)
आज या कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के वाढीसह 304 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. त्याच वेळी या शेअर्सची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 192.80 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 343.80 रुपये होती. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 445 रुपये किंमत स्पर्श करू शकतात असा अंदाज जेएम फायनान्शियलने व्यक्त केला आहे.
बंधन बँक : (Bandhan Bank Share Price)
आज या बँकेचा शेअर 1.67 टक्के घसरणीसह 233 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. त्याच वेळी, या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 209.55 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 349.55 रुपये होती. पुढील एका वर्षात या शेअरची किंमत 325 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज जेएम फायनान्शियल फर्म व्यक्त केला आहे.
PB Fintech : (PB Fintech Share Price)
आज या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 462 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 356.20 रुपये होती. ते उचांक किंमत पातळी 1052.95 रुपये होती. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 910 रुपयांची किंमत पातळी स्पर्श करू शकतात, असा अंदाज जेएम फायनान्शियल फर्मने व्यक्त केला आहे.
बलरामपूर चिनी : (Balrampur Chini Share Price)
आज या कंपनीचे शेअर्स 0.025 टक्के वाढीसह 396.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 307.30 रुपये होती, तर उच्चांक किंमत पातळी 524.90 रुपये होती. पुढील एक वर्ष कालावधीत हा स्टॉक 465 रुपयांची किंमत पातळी स्पर्श करू शकतो, असा अंदाज जेएम फायनान्शियल फर्मने व्यक्त केला आहे.
SRF लिमिटेड : (SRF Share Price)
आज या कंपनीचा शेअर 0.91 टक्के घसरणीसह 2303.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहेत. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 2,002.20 रुपये होती. तर या शेअरची उचांक किंमत पातळी 2,865.00 रुपये होती. पुढील एका वर्षात हा स्टॉक 3,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज जेएम फायनान्शियलने वर्तवला आहे.
गो फॅशन इंडिया लिमिटेड : (GoFashion India Share Price)
आज या कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1169.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 847.30 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 1453 रुपये होती. पुढील एका वर्षात हा स्टॉक 1410 रुपयांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज जेएम फायनान्शियल फर्मने व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.