28 March 2023 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात वार्षिक 1.50 लाखपेक्षा जास्त गुंतवणूक करता येईल? जाणून घ्या पूर्ण तपशील

PPF Scheme

PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या सरकारी बचत योजनेत गुंतवणूकदारांना हमखास परतावा मिळतो. पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे यामधून मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. जर तुम्ही सध्या आयकर भरत असाल आणि तुम्ही पीपीएफ खात्यात गुंतवणूक सुरू केली तर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत तुम्हाला मिळणारे उत्पन्न करमुक्त असेल. आयटी कायद्याच्या कलम 80C अंतर्गत जे लोक विमा योजनेत योगदान देतात, त्यांनाही कर सवलतीचा लाभ दिला जातो.

पीपीएफ योजना EEE श्रेणीमध्ये सामील :
जेव्हा आपण पीपीएफ खात्यात गुंतवणूक करतो, आणि त्यावर आपल्याला व्याज परतावा मिळतो, या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. PPF योजना खाते परिपक्व झाल्यावर रक्कम एकत्र काढल्यास तुम्हाला संपूर्ण कर सूट मिळू शकते. वास्तविक, PPF योजनेवर आयकर कायद्याची EEE श्रेणी लागू आहे. एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जमा केलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि योजनेच्या मुदतपूर्तीवर मिळणारी संपूर्ण रक्कम ही PPF योजनेच्या EEE श्रेणीमध्ये गणली जाते.

2014 मध्ये भारत सरकारने पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीची काल मर्यादा वाढवली होती. तज्ज्ञांनी म्हंटले आहे की, PPF योजना पूर्वी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना कायदा 1968 अंतर्गत राबवली जात होती. त्यावेळी PPF योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा एका आर्थिक वर्षात 1,00000 रुपये निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच, PPF योजनेत गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात कमाल 1,00000 रुपये जमा करू शकत होता. ऑगस्ट 2014 मध्ये PPF योजनेची गुंतवणूक मर्यादा 1 लाख रुपयांवरून वाढवून 1,50,000 रुपये निश्चित करण्यात आली होती. भारत सरकारने डिसेंबर 2019 मध्ये PPF योजना नियम 1968 रद्द केला. त्यानंतर सरकारने ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना 2019’ ही नवीन नियमावली लागू केली. सध्या ही नवीन PPF योजना ‘सरकारी बचत प्रोत्साहन कायदा 1873’ अंतर्गत राबवली जात आहे.

पीपीएफ मध्ये किमान आणि कमाल गुंतवणूक :
एका आर्थिक वर्षात PPF योजना खात्यात कमाल 150,000 रुपये जमा करता येतात. पीपीएफ योजना खात्यातील ठेवींच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. या योजनेत, गुंतवणूकदार आपल्या पीपीएफ खात्यात कितीही वेळा 500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवू शकतो. पीपीएफ एका वर्षात किमान 500 रुपये जमा करावे लागतात. तर कमाल गुंतवणूक मर्यादा रक्कम 150000 रुपये आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
PPF योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला हमखास परतावा मिळतो, आणि त्याची गुंतवणूक रक्कम सुरक्षित राहते. PPF खाते EEE श्रेणीत येत असल्याने त्यावर कर सवलतीचा लाभ मिळतो. PPF योजनेवर ज्या दराने व्याज परतावा मिळतो, तो व्याजदर वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे निर्धारित केला जातो. सध्या PPF योजनेवर वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला जातो. 2012-13 या आर्थिक वर्षात PPF योजनेच्या गुंतवणूकदारांना 8.8 टक्के दराने व्याज परतावा देण्यात येत होता. या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलत, चक्रवाढ व्याज, आणि हमखास परतावा हे लाभ इतर योजनाच्या तुलनेत अनेक पटींनी फायदेशीर ठरतात.

बजेट 2023 पासून अपेक्षित बदल :
भारत सरकार काही महिन्यांनी अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे. अशा परिस्थितीत 2023 च्या अर्थसंकल्पात भारत सरकार आयकर कायद्यातील कलम 80C ची व्याप्ती वाढवेल अशी शक्यता आहे. सरस्वती कस्तुरीरंजन यांनी म्हंटले आहे की, जर भारत सरकारने पीपीएफ योजनेची कमाल गुंतवणुक मर्यादा वाढवली तर लोकांना याचा खूप फायदा होईल आणि PPF mashe गुंतवणूकीचा ओघ आणखी वाढेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF Scheme Investment return in long term check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x