
Money Making IPO| Electronics Mart India कंपनीचा शेअर 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी शेअरमध्ये 10-10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला. मागील तीन दिवसांत या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर 83.70 रुपयांवर बंद झाला होता.
IPO ओपनिंग :
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया IPO चा प्राइस बँड 56-59 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आला होता. 17 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्टॉक BSE निर्देशांकावर 51 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला होता. ज्या लोकांना या कंपनीचे शेअर्स वाटप झाले होते, त्यांना IPO लिस्टिंगमध्ये 30 रुपये प्रति शेअर नफा झाला आहे. हा IPO NSE निर्देशांकावर 53 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला होता. 17 ऑक्टोबर 2022 रोजी तो स्टॉक 83.70 रुपयांवर बंद झाला होता.
स्टॉक अप्पर सर्किटवर :
हा स्टॉक मागील दोन दिवस अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. 18 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअरची वाढीसह 92.95 रुपयांवर ट्रेड करत होता. यासोबतच स्टॉकमध्ये सलग दोन दिवस 10 टक्के अपर सर्किट लागला होता. 19 ऑक्टोबर 2022 ला इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर 102.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकमध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. मागील या तीन दिवसांत शेअरने 103.65 रुपयांचा उच्चांक किंमत पातळी गाठली आहे.
4 ते 7 ऑक्टोबर 2022 दरम्यान हा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO साठी प्रति लॉट 14,986 रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. एका लॉटमध्ये गुंतवणूकदाराला 254 शेअर्स देण्यात आले आहेत. ज्या लोकांनी 14,986 रुपये जमा करून लॉट बुक केला होता, त्यांच्या डिमॅट मध्ये शेअर्स जमा करण्यात आले. त्यामुळे अशा शेअर धारकांची गुंतवणूक दोन दिवसात दुप्पट झाली होती. गुंतवणूक रक्कम 14,986 रुपयांवरून 26,327 रुपये झाली आहे.
IPO बद्दल थोडक्यात :
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा IPO आकार 500 कोटीं रुपये होता. या कंपनीने त्याची एका शेअरची किंमत 56-59 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. IPO मधील 50 टक्के वाटा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड/EMIL कंपनी सुरू केली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.