13 December 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक प्राईस ₹190 लेव्हल स्पर्श करणार - Maharashtranama Marathi

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या स्टॉकने गुंतवणुकदारांना फारसा परतावा दिला नाही. टाटा स्टील कंपनीचे (NSE: TATASTEEL) एकूण बाजार भांडवल 1,90,747.00 कोटी रुपये आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.4 टक्के घसरले होते. (टाटा स्टील कंपनी अंश)

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.2 टक्के होती. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.31 टक्के घसरणीसह 151.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच टाटा स्टील कंपनीने The Indian Steel & Wire Products Ltd कंपनीचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. ISWP कंपनीचे 36 कोटींचे अधिकृत इक्विटी शेअर भांडवल प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स टाटा स्टील कंपनीच्या अधिकृत भागभांडवलामध्ये विलीन करण्यात येणार आहे. 2022 मध्ये टाटा समूहाने टाटा स्टील कंपनीमध्ये सहा उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती.

टाटा स्टील कंपनीमध्ये टाटा मेटालिक्स, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स आणि द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया या तीन सूचीबद्ध कंपन्यां विलीन केले जाणार आहे. तसेच The Indian Steel & Wire Products टाटा स्टील मायनिंग आणि S&T मायनिंग या असूचीबद्ध कंपन्या टाटा स्टील कंपनीमध्ये विलीन केले जाणार आहेत. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकची रेटिंग BUY वरून HOLD वर डाउनग्रेड केली आहे. जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक पुढील काळात 190 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

21 जून रोजी टाटा स्टील स्टॉक एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होता. 3.60 रुपये अंतिम लाभांश पेआउट करण्यासाठी कंपनीने 19 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. 2022 मध्ये या कंपनीने 51 रुपये सर्वाधिक लाभांश पेआउट केले होते. याव्यतिरिक्त टाटा स्टील कंपनीने 1 शेअरवर 1 बोनस शेअर्स वाटप केला होता. तसेच 2022 मध्ये टाटा स्टील स्टॉक 1:10 या प्रमाणात एक्स-स्प्लिट झाला होता.

News Title | Tata Steel Share Price NSE: TATASTEEL 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x