
Money Making Stocks | सप्टेंबर 2022 च्या सकारात्मक तिमाही निकालांमुळे कर्नाटक बँकेचे शेअर्स तेजीत आले आहेत. कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये फक्त 3 दिवसात 45 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कर्नाटक बँकेचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 143 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या काही तासात कर्नाटक बँकेचे शेअर्स 14 टक्केच्या वाढीसह 138.05 रुपयांवर बंद झाले होते. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 143 रुपये आहे. त्याच वेळी, कर्नाटक बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 55.25 रुपये होती.
कर्नाटक बँकेचे शेअर्स मागील 3 दिवसांपूर्वी 93 रुपयांवर ट्रेड करत होते, सध्या या स्टॉकची किंमत 135 रुपयांवर गेली आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कर्नाटक बँकेचे शेअर्स 93.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक बँकेचे शेअर्स 138.05 रुपयांवर ट्रेड करत होते. कर्नाटक बँकेचे शेअर्स मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये 43 रुपयांनी वधारले आहेत. मागील एका महिन्यात कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये 65 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, चालू वर्षात आतापर्यंत कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये 118 टक्के वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्स 113 टक्के मजबूत झाली आहे.
चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कर्नाटक बँकेने 411 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कर्नाटक बँकेमे 411.5 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कर्नाटक बँकेने कमावलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत कर्नाटक बँकेच्या नफ्यात 228 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 2021 या मागील वर्षीच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कर्नाटक बँकेने 125.45 कोटी रुपयांचा प्रॉफिट कमावला होता. कर्नाटक बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण 525.52 कोटी रुपयांचा प्रॉफिट जमा केला असून हा खाजगी बँकेने कमावलेला आतापर्यंतचा सर्वाधिक सहामाही नफा मानला जात आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीत कर्नाटक बँकेने 114.18 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कर्नाटक बँकेचा जून तिमाहीत एकूण महसूल संकलन 1629.08 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत वाढून कर्नाटक बँकेचे महसूल संकलन वाढून 1771.05 कोटी रुपयेपर्यंत गेले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.