
Money Making Stocks | गृहनिर्माण क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देणार आहे. या कंपनीचे नाव आहे,”स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड”. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. तसेच कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाण विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स-बोनस आणि एक्स-स्टॉक स्प्लिटवर ट्रेडिंग करत होते.
शेअर्समध्ये 20 टक्के वाढ :
Star Housing Finance Ltd कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान 20 टक्क्यांची जबरदस्त पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्सनी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 60.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत पातळी स्पर्श केली होती. स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 20.05 रुपये होती. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने 8.63 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, कंपनीने मागील तिमाहीत एकूण 2.17 कोटी रुपये नफा कमावला आहे.
इतर कंपन्या ज्यानी एक्स-बोनसवर व्यवहार केला :
स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी व्यतिरिक्त, ग्लोस्टर कंपनी, सीएल एज्युकेट या कंपन्यांचे शेअर्स देखील एक्स बोनस रेटवर ट्रेड करत होते. गा कंपन्यांनी देखील आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ग्लोस्टर लिमिटेड आणि सीएल एज्युकेट या दोन्ही कंपन्या आल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ग्लोस्टर लिमिटेड आणि सीएल एज्युकेट या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी एक्स-बोनस रेटवर ट्रेड करत होते. Gloster Limited कंपनीचे शेअर्स जवळपास 3 टक्के वाढीसह 887.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी सीएल एज्युकेट कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांची वाढीसह 81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.