
IPO in Focus | ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO ला SME गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद प्राप्त झाला आहे. IPO गुंतवणूकीची मुदत पूर्ण झाल्यावर आता गुंतवणूकदारांचे पुणे लक्ष शेअर्सची वाटप आणि लिस्टिंगवर लागले आहेत. BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहिती नुसार ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO सबस्क्रिप्शन स्टेट्सनुसार 13 ते 15 डिसेंबर 2022 या तीन दिवसांत कंपनीचा 33.97 कोटी रुपयांचा IPO 243.70 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. Droneacharya Aerial Innovations या SME कंपनीचा IPO चा एकूण 287.80 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत :
गुंतवणूकदारांनी या IPO ला दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये कमालीचे प्रदर्शन करत आहे. शेअर बाजारात कमजोरी असून पण ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. सबस्क्रिप्शन बंद झाल्यानंतर ग्रे मार्केटमध्ये आणखी वर गेले आहेत. शेअर बाजार तज्ञाच्या मते, ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
GMP म्हणजे काय ? :
Droneacharya Aerial Innovations कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ ग्रे मार्केटमधील गुंतवणुकदारांनाचा विश्वास आहे की या SME कंपनीचे शेअर 126 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. कंपनीने IPO मध्ये शेअर 54 रुपये प्रति शेअर या दराने ऑफर केले आहेत.
IPO ची किमान आणि कमाल लॉट साइज :
ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची लॉट साइज 2000 शेअर्स प्रती लॉट आहे. म्हणजेच तुम्हाला या IPO मध्ये एक लॉटसाठी बोली लावण्यासाठी किमान 108,000 रुपये जमा करावे लागतील. ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड प्रति इक्विटी शेअर 52 ते 54 रुपये जाहीर करण्यात आली होती. GMP नुसार शेअर्स 126 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. जर हा स्टॉक 126 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला तर, कंपनीच्या गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या दिवशी 216,000 रुपये परतावा मिळेल. ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स 23 डिसेंबर 2022 रोजी बीएसई एसएमई एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.