21 February 2020 2:22 AM
अँप डाउनलोड

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते; पण चुकून जय शहांचं १५०० टक्क्यांनी वाढलं: सविस्तर

Caravan Magazine, Amit Shah, Jay Shah, PM Narendra Modi

नवी दिल्ली: केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची संपत्ती तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचा गौप्यस्फोट एका संकेतस्थळाने केला आणि देशात जणू भूकंपच झाला होता. ज्या मुलाबाबत ही बातमी होती तो म्हणजे जय शहा. केंद्रीय गृहमंत्री अन् भाजपच्या सर्व सत्ताधीशांमधील क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांचे चिरंजीव. जयच्या माध्यमातून तेव्हा काँग्रेसने मोदी-शहा जोडगोळीवर प्रचंड रान उठविले. पुढे अर्थातच हे प्रकरण शीतपेटीत गेले. तेव्हा प्रकाशात आलेले जय शहा हे नंतर येनकेन प्रकारे माध्यमांत झळकत राहिले. आता तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाल्याने पेज थ्रीसह विविध बातम्यांध्ये सतत झळकत राहणार यात शंका नाही. हे महाराज बीसीसीआयमध्ये अचानक कसे टपकले, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

Loading...

आज जयने याच संघटनेचा अध्यक्ष या नात्याने पुढची पायरी गाठली आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेले जय हे शेअर बाजारातील दर्दी आहेत. विविध कंपन्या व त्यासाठी केलेले बँकिंग व्यवहार यातही ते वादग्रस्त ठरले होते. कुसुम फिनर्व्ह या शेअर बाजाराशी संबंधित त्यांच्या कंपनीला मध्य प्रदेशात पवनऊर्जा क्षेत्रातील कंत्राट मिळाले तेव्हाही सत्तेच्या दुरुपयोगाचा आरोप झाला होता. कारकिर्दीची सुरुवातच ज्यांची अशी सनसनाटी झाली असे जय हे आता अशाच एका बड्या व तेवढ्याच वादग्रस्त संघटनेत महत्त्वाचे पद सांभाळणार असल्याने खऱ्या अर्थाने त्यांची व बीसीसीआयचीही कसोटी लागणार आहे.

दुसरीकडे, जय शाह यांच्या कंपनीची कमाई एक हजार ५०० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त ‘द कारवान’ या वेबसाईटने दिले आहे. २०१४ मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर जय शाह यांच्या कुसुम फिनझर्व्ह एलएलपी या कंपनीची एकूण कमाई ७९ लाख ६० हजार रुपये इतके होते. मागील पाच वर्षांमध्ये या कंपनीची एकूण कमाई ११९ कोटी ६१ लाख रुपये इतकी झाल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. कुसुम फिनझर्व्ह एलएलपीनं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर माहिती दाखल केली होती. कंपनीनं दाखल केलेल्या माहितीच्या आधारे कारवाननं कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचं वृत्त दिलं आहे. या कंपनीत जय शाह भागीदार असून, कंपनीच्या संचालक पदाच्या समतुल्य पदावर कार्यरत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर म्हणजेच २०१४ ते २०१९ या आर्थिक वर्षात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी कंपनीच्या संपत्तीत ११८ कोटी रूपयांहून अधिकची वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे.

सदर वृत्तामधील माहितीनुसार २०१७ ते २०१८ दरम्यान जय यांच्या कंपनीला आर्थिक व्यवहाराचे तपशील देण्यास सांगण्यात आले तेव्हा या कंपनीची कमाई भरमसाठ वाढल्याचे पहिल्यांदा लक्षात आले. २०१४ आणि २०१५ मध्ये कंपनीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही २०१६ पासून कंपनीला मोठ्या प्रमाणात क्रेडिटवर मोठी रक्कम देण्यात आल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे.

फोटो सौजन्य: ‘द कारवान’
कारवानच्या या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जय शाह यांच्यावर टीका केली आहे. “द कारवाननं दिलेलं वृत्त आता मारून टाकलं जाईल. कनपट्टी पर गन लगा कर,” असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. ३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन जय शाह यांच्या संपत्तीसंदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खैरा यांनी जय शाह यांच्या कंपनीने २०१७ ते २०१८ च्या आर्थिक व्यवहारांचा तपशील कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला दिला नसल्याचा आरोप केला आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीने आयकर भरला नाही तर तो मोठा गुन्हा समजून त्याला पाच लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जातो मात्र जय शाह यांच्या प्रकरणात हे असं होताना दिसत नसल्याचे खैरा यांनी म्हटले आहे. “आयकर न भरल्यास होणाऱ्या दंडासंदर्भातील कायदा युवराज जय शाह यांना लागू होतं नाही कारण त्यांच्या कंपनीने २०१७ आणि २०१८ चे विवरण सादर केलेले नाही,” असं टोलाही खैरा यांनी लगावला आहे.

जय शाह यांची कुसुम फिनझर्व्ह एलएलपी ही कंपनी असा कोणता व्यवसाय करते की त्यांना एक हजार ५०० टक्क्यांचा नफा झाला आहे असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे. शेअर ट्रेडींग, शेती उत्पादने, कन्सल्टन्सी या क्षेत्रात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी काम करते. तत्पूर्वी २०१७ मध्ये अमित #AmitShahKiLoot ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये येण्याचं कारण देखील त्यांचे पुत्र जय शहा होते आणि त्यावर देखील अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

NOTE: mahapariksha, mahaportal, maha portal, mahapolice, govnokri, govnokri, govnokari, mpscworld, mpsc world, majhi naukri, majhinaukri, mazi nokari, majhi nukari, mahampsc, mahaonline, mahanmk, mahadbt, mahadbt login, mahadbtmahait, mahadbtmahait, mahanews, maha news, nokari sandharbha, majhanews, Current Recruitment 2020, Latest Government Jobs, Latest Government Jobs In Maharashtra 2020, Government Recruitment, Jobs in Government Sectors, Bank Jobs, Online Application Form, Defence Job, Engineering Jobs, freshersworld, freshers world, maharashtra police, Police Bharti, drdo recruitment, ibps, government jobs, lic recruitment, fresherslive, driving licence test, general knowledge, rto exam, mscit, ms cit, mscit course, ms cit course, driving licence test, learning license test, driving license test, learning licence test, parivahan, rto exam in english, learning licence test questions, NIOS Bridge Course for B.Ed Teacher, Talathi Bharti

हॅशटॅग्स

#Amit Shah(226)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या