
Stock In Focus | मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड/MSWIL कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात 57 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स 150 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता 65 रुपयांवर पोहोचले आहेत. अशा पडझडीचे काळातही कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. मदरसन सुमी कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2:5 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटला करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 5 विद्यमान शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे.
कंपनीचे बोनस शेअर्सवर मत :
या कंपनीने नुकताच स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी एक प्रस्ताव पारित केला आहे. संचालक मंडळाने बोनस शेअरसाठी 2:5 हे प्रमाण निश्चिती एकेल आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस देण्याचे जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. या कंपनीने आपल्या पात्र शेअर्स धारकांना बोनस जारी करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
कंपनीची कामगिरी आणि नफा :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 1,670.94 कोटी रुपये होता. तर कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 1,835.21 कोटी रुपये निव्वळ महसूल कमावला आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 190 कोटीचा EBITDA नोंदवला आहे. आथिर्क वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 194 कोटी रुपये होता. EBITDA मध्ये सरासरी वार्षिक 2 टक्के घट दिसून आले आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 116 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. जो Q2-FY22 मध्ये 133 कोटी रुपये होता, Q1-FY23 मध्ये 125 कोटी रुपये होता. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक दर वार्षिक प्रमाणे 12 टक्के आणि तिमाही दर तिमाही प्रमाणे 7 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.