
Motisons Jewellers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जयपूर स्थित मोतीसन्स ज्वेलर्स नावाची कंपनी 18 डिसेंबर 2023 रोजी आपली IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचा IPO स्टॉक आपल्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 3 पट अधिक किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 182 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. म्हणजेच शेअर्सची ग्रे मार्केटमधील किंमत 100 रुपये प्रीमियमवर पोहचली आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO शेअर्सची इश्यूची किंमत 55 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केट प्रीमियम आणि इश्यू किंमत यांचा विचार केला तर, मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO स्टॉक 155 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या IPO चा आकार 152 कोटी रुपये आहे. कंपनीने आपल्या शेअर्सची किंमत बँड 52 ते 55 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. हा IPO ऑफर फॉर सेल अंतर्गत नसेल. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनी आपल्या IPO मध्ये फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. यामध्ये 152 कोटी रुपये मूल्याचे 2.74 कोटी इक्विटी शेअर्स असतील. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE इंडेक्सवर 26 डिसेंबर 2023 रोजी सूचीबद्ध केले जातील.
मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 250 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना या IPO चा एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 13750 रुपये जमा करावे लागतील. आणि 14 लॉट खरेदी करण्यासाठी 192,500 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीच्या IPO अंतर्गत, 50 टक्के वाटा QIB साठी राखीव असेल. तर 15 टक्के वाटा NII साठी राखीव असेल. 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष 2021 मध्ये मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीने 213 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 200 कोटी रुपये खर्च केला होता. आणि 9.67 कोटी रुपये PAT नोंदवला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 315 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि 294 कोटी रुपये खर्च केला होता. आणि 14.75 कोटी रुपये PAT नोंदवला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 367 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर 337 कोटी रुपये खर्च केला आहे. आणि 22.20 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.
मोतीसन्स ज्वेलर्स ही कंपनी मुख्यतः ज्वेलरी संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी सोने, कुंदन, हिरे, मोती, चांदी, प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान दगडांपासून बनवलेल्या दागिन्यांचा व्यवसाय करते. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनी सोन्या-चांदीची नाणी, भांडी आणि इतर कलाकृती देखील बनवण्याचा व्यवसाय करते.
या कंपनीच्या उत्पादनांमध्ये पारंपारिक, आधुनिक आणि संयोजन डिझाइन सामील आहेत. सध्या मोतीसन्स ज्वेलर्स ही कंपनी जयपूर शहरात मोतीसन्स ब्रँड अंतर्गत 4 शोरूम हाताळते. यासह ही कंपनी आपली उत्पादने आपल्या कंपनीच्या वेबसाइटद्वारे देखील विकण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.