
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने शुक्रवारी तेजीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 20 टक्के वाढले होते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1040 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.32 रुपये होती.
मागील 5 दिवसात शेअर्सने 24 टक्के परतावा दिला
मागील 5 दिवसात मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 61 टक्के नफा कमावून नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 80 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 68.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट
मागील एका वर्षात मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. 26 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या पातळीवरून हा स्टॉक आता 69 रुपये किमतीवर पोहचला आहे.
मागील 5 वर्षांत शेअरने 2077 टक्के परतावा दिला
मागील 5 वर्षांत मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2077 टक्के वाढवले आहेत. गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत.
मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी परिवर्तनीय सिक्युरिटीज, इक्विटी शेअर्स, प्रेफरेंशियल इश्यू, प्रायव्हेट प्लेसमेंट, वॉरंट किंवा डेट सिक्युरिटीज किंवा पात्र संस्थात्मक प्लेसमेंट याद्वारे भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मुफिन ग्रीन फायनान्स ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वित्तपुरवठा करण्याचे काम करते.
या कंपनीने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांना 350 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे 1.73 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने 49 कोटी ईव्ही मालमत्ता भाडे तत्वावर दिले आहेत. आणि 354 दशलक्ष ग्रीन किलोमीटर कव्हर केले आहे.
मुफिन ग्रीन फायनान्स ही भारतातील एक आघाडीची NBFC कंपनी असून जी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते. ही कंपनी अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना ई-स्कूटी, ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते. यासोबतच मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी इलेक्ट्रिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, बॅटरी स्वॅपिंग यासारखे व्यवसाय देखील करते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक तीन चाकी, इलेक्ट्रिक फोर व्हीलर वाहनांच्या B2B वित्त पुरवठा व्यवसाय देखील करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.