
Muhurat Trading 2022 | दर वर्षीप्रमाणे 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार एक तासासाठी उघडला जाईल. BSE आणि NSE निर्देशांकावर उपलब्ध माहितीनुसार इक्विटी, डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग संध्याकाळी 6 वाजता सुरू केली जाईल आणि एक तास 15 मिनिटांनी म्हणजेच 7:15 वाजता बंद होईल. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:08 वाजता संपेल. मुहूर्त ट्रेडिंग सत्रात ऑर्डर मॅचींग वेळ संध्याकाळी 6:08 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत असेल.
1. ऑप्शन कॉल ट्रेडिंग मधील व्यापार संध्याकाळी 7:45 वाजता संपेल. दिवाळी 2022 च्या मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारातील सर्व व्यवहारांवर सेटलमेंट लायबिलिटी होईल.
2. दिवाळी 2022 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटची मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6:15 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7:15 वाजता बंद होईल. तथापि, ट्रेडिंग रद्द करण्याची वेळ संध्याकाळी 7:25 पर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.
3. दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग मध्ये करन्सी डेरिव्हेटिव्ह विभागामध्ये देखील ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि IRD मध्ये ट्रेडिंग रद्द करण्याची वेळ संध्याकाळी 7:25 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
4. क्रॉस करन्सी डेरिव्हेटिव्हज मधील ट्रेड फेरफार देखील संध्याकाळी 7:25 पर्यंत चालू राहील. ऑर्डर रद्द करण्याची विनंत्या संध्याकाळी 7:30 पर्यंत करू शकता.
5. दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग सेगमेंट (SLB) विभागाची ट्रेडिंग वेळ संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत ठरवण्यात आली आहे. नवीन संवत 2079 ची सुरुवात म्हणून दिवाळी च्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग केली जाते. तेव्हा पारंपारिक ट्रेडर्स आणि व्यापारी समुदाय त्यांचे मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करतात, जी शुभ मानली जाते.
6. तुम्हाला जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर थेट BSE हेल्पडेस्कशी 022-45720400/600 नंबरवर किंवा [email protected] वर ई-मेलद्वारे संपर्क करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.