
Multibagger IPO | या वर्षी शेअर बाजारात अनेक इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे IPO आले होते, त्यातील काहींनी गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. असाच एक आयपीओ सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा IPO असाच एक मल्टीबॅगर IPO म्हणून ओळखला जातो. 2017 साली सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग झाली होती, आणि या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 450 टक्के पेक्षा आधी नफा कमावून दिला होता. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ मध्ये शेअर्सचे वाटप झाले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता अनेक पटींनी वाढले आहेत.
IPO इश्यूपासून शेअरची वाटचाल :
सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचा IPO ऑगस्ट 2017 मध्ये 31 रुपये च्या किंमत बँडमध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. स्टॉकची लिस्टिंग सुस्त झाली होती मात्र नंतर स्टॉकने कमालीची कामगिरी केली. गुंतवणूकदारांनी यातून मजबूत परतावा कमावला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने 85 रुपये वरून 169 रुपयेवर झेप घेतली आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात लोकांना 110 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही IPO च्या वेळी या कंपनीच्या शेअर्स वर 1.24 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 6.76 लाख रुपये झाले असते. मागील पाच वर्षांत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 450 टक्के परतावा मिळाला असता.
BPCL कडून मोठी ऑर्डर प्राप्त :
सर्वोटेक पॉवर कंपनीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीकडून 46.2 कोटी रुपये किमतीची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी बाहेर येताच शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. सर्वोटेक पॉवरकंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत भागीदारी करून देशभरात विविध ठिकाणी DC फास्ट ईव्ही चार्जर्सचे 800 युनिट्स स्थापित करणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.