14 December 2024 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Multibagger Penny Stocks | खिशात चिल्लर आहे का? हे चिल्लर किंमतीचे शेअर्स करोडोमध्ये परतावा देत आहेत, लिस्ट सेव्ह करा

Multibagger Penny stocks

Multibagger Penny Stocks | स्कॅम 1992 ही प्रसिद्ध वेबसिरिज तर तुम्हाला माहीतच असेल. या मध्ये एक जबरदस्त डायलॉग आहे,” रिस्क है तो इश्क है”. पेनी स्टॉक कंपन्यासाठी हा डायलॉग एकदम फिट बसतो. शेअर बाजार ही एक अशी दुनिया आहे, ज्यात तुम्ही जेवढी जास्त जोखीम घ्याल तेवढा जास्त फायदा तुम्हाला मिळेल. पेनी स्टॉक हे अतिशय लहान कंपन्यांचे शेअर्स असतात, ज्यांची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते. आज आपण अशा दोन पेनी स्टॉक्स कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट अधिक गुणाकार केले आहेत.

एका वर्षात 418 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स :
Integra Essentia Ltd कंपनीने अवघ्या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 418 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स कमावून दिले आहेत. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर फक्त 1.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 8.55 रुपयांवर गेली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.05 रुपये आहे. या पेनी स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 364 टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या शेअर मध्ये पैसे लावून लोकांनी सुमारे 25 टक्के परतावा कमावलणाहे, तर गेल्या 5 दिवसांत लोकांनी 4.27 टक्के प्रॉफिट कमाई केली आहे.

चौपट परतावा देणारा स्टॉक :
Zenith Steel Pipes & Industries Ltd कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 332 टक्के पेक्षा अधिक प्रॉफिट कमावून दिला आहे. हा स्टॉक एक वर्षापूर्वी 1.25 रुपयावर ट्रेड करत होता, तो आता 5.45 रुपयावर पोहोचला आहे. सध्याची 5.45 रुपये ही किंमत स्टॉकची 52 आठवड्याची उच्चांक किंमत आहे. मागील पाच दिवसांपासून या स्टॉकमध्ये घट पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात हा स्टॉक 10 टक्के पडला आहे. गेल्या एका महिन्यात शेअरची किंमत 7 टक्क्यांनी वधारली होती. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 48 टक्क्यापेक्षा अधिक वाढले असणार.

पेनी स्टॉकमध्ये धोका :
शेअर बाजारात पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक मानले जाते. पण पेनी स्टॉक जेव्हा तेजीत येतात, तेव्हा ते आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवून थांबतात. वास्तविक पेनी स्टॉकशी संबंधित कंपन्याचे बाजार भांडवल खूप कमी असते. या कंपन्या बद्दल जास्त माहिती उपलब्ध नसते. म्हणून अशा शेअर्समध्ये कोणतीही माहिती नसताना गुंतवणूक करणे खूप धोक्याचे आहे. बाजारात ट्रेडिंगसाठी चांगले पेनी स्टॉक खूप मर्यादित आहेत. पेनी स्टॉक कंपन्यांचे बाजार भांडवल कमी असते, आणि त्यात तरलता ही कमी असते, यामुळे अशा शेअरच्या किमतीत जबरदस्त उलथापालथ होत असते.

पेनी स्टॉक घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :
कोणत्याही स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स घेण्या आधी कंपनीबद्दल सखोल माहिती गोळा करा, त्यांचे संशोधन करा. कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन, कामगिरी आणि पार्श्वभूमी पाहूनच स्टॉकमध्ये पैसे लावा. पेनी स्टॉकच्या किमती स्थिर नसतात, त्यामुळे पैसे लावण्यापूर्वी शेअरची किमान आणि कमाल किंमत जाणून घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी तज्ञाशी चर्चा करा. एकाच वेळी सगळे पैसे लावू नका. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून नुकसान झाल्यास तुम्हाला जास्त कारक पडणार नाही, एवढीच रक्कम लावा, कारण पेनी स्टॉक जास्त जोखमीचे असतात. पेनी स्टॉकमध्ये थोडी फार वाढ झाली की प्रॉफिट बुक करा, जास्त काळ वाट पाहू नका. पेनी शेअर्सची किंमत झटपट वाढते, तशी झटपट कमी देखील होते. थोडाफार परतावा मिळाला तर प्रॉफिट बुक करून बाहेर पडा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny stocks has given huge returns on short term on 15 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stocks(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x