
Multibagger Stocks | शेअर बाजारात स्मॉल कॅप स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे मानले जागे. पण काही स्मॉल स्टॉक असे आहेत जे आपल्या भागधारकांना कमालीचा परतावा कमावून देत आहेत. आज आपण अशा एका स्मॉल कॅप स्टॉकाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉक चे नाव आहे,”अॅटम वाल्व्ह”. अॅटम वाल्व्ह ही एक स्मॉल-कॅप कंपनी आहे.
BSE निर्देशांकावर हा शेअर 299.65 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत आहे. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने कमालीचे प्रदर्शन केले आहेत. जानेवारी 2022 मध्ये हा स्टॉक 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 7 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्टॉक 285 रुपये किमतीवर गेला होता. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये 11 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 च्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या लोकांची गुंतवणूक सध्याच्या किमतीनुसार अनेक पटींनी वाढ झाली आहे. या कंपनीने नुकताच 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली होती.
कंपनीच्या शेअर्सची किंमत :
ATAM कंपनी प्लंबिंग व्हॉल्व्ह आणि फिटिंग्ज उद्योगात सर्वात मोठी आघाडीची उत्पादक कंपनी आहे. 6 ऑक्टोबर 2020 रोजी BSE निर्देशांकवर MT group ऑफ सिक्युरिटीज अंतर्गत “अॅटम वाल्व्ह” कंपनीचे शेअर्स लॉन्च केले गेले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅटम वाल्व्हचे शेअर्स 5 टक्के अप्पर च्या सर्किटवर लागले होते, आणि दिवसा अखेर स्टॉक 285.40 रुपये किमतीवर बंद झाला होता. सध्या हा स्टॉक BSE निर्देशांकावर अप्पर सर्किटमध्ये 299.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बोनस शेअर्स घोषित :
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 6 ऑक्टोबर 2022 रोजी SEBI नियामक फाइलिंगमध्ये, या कंपनीने आपल्या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख 12 ऑक्टोबर वरून बदलून 24 ऑक्टोबर निश्चित केली आहे. एटम वाल्व्ह ने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1:1 गुणोत्तरात बोनस शेअर्स इश्यू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, कंपनी आपल्या भागधारकांना प्रत्येक 1 शेअरवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे.
मालामाल गुंतवणूकदार :
चार्ट पॅटर्न चे निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की अॅटम वाल्व्ह कंपनीचे शेअर्स 500.84 टक्के वर गेले आहेत. जर तुम्ही चालू वर्ष जानेवारीत अॅटम वाल्व्हच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती तर, तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 6 पटीने वाढून 6 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.