1 May 2025 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Multibagger Stocks | 1 वर्षात 800 टक्के परतावा, आता शेअर स्वस्तात मिळणार, पाहा स्टॉकचे नाव आणि किंमत

Multibagger Stocks

Multibagger Stocks| शेअर बाजारात आपण पाहतच असाल की मेटल असो की ऑटो स्टॉक, आणि IT असो की Tech कंपनी, सर्व शेअर्स गडगडले आहेत. बाजारात अस्थिरता आणि निराशेचे वातावरण आहे. अश्या वेळी पश्चिमात्य देशात येणाऱ्या आर्थिक मंदीच्या संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागला आहे. अश्या विपरीत काळातही Deep Diamond ही अशी कंपनी आहे जिने चालू वर्षात आपल्या भागधारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. या एका वर्षात Deep Diamond कंपनीच्या शेअर्समध्ये 800 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. इतका अप्रतिम परतावा दिल्यानंतर कंपनी आता स्टॉक स्प्लिट करणार आहे. दीप डायमंडच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्यास मान्यता दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्प्लिटबद्दल सविस्तर तपशील

कंपनीने SEBI नियामकला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स विभाजन करून 1 रुपये दर्शनी मूल्यावर वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. “सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कंपनीचा सध्याच्या एक शेअरचे 10 शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. त्यानंतर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. deep Diamond कंपनीची स्थापना 1993 मध्ये झाली होती.

शेअरची बाजारातील कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये Deep Diamond कंपनीचे शेअर्स 1.47 टक्क्यांनी पडले होते. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शेअर गडगडल्यानंतर 134.50 रुपये किमतीवर आले होते. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 1191.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणूक 796.67 टक्के वाढली असती. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 989.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये शेअर्स 804 टक्क्यांनी वर गेले आहेत. गेल्या ६ महिन्यांत ज्या लोकांनी हे शेअर खरेदी केले होते, ये सध्याच्या बाजार भावा नुसार लखपती झाले असतील. गेल्या सहा महिन्यात दीप डायमंडच्या शेअर्समध्ये 837 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142.20 रुपये आहे. आणि Deep Diamond ही 41.74 कोटी रुपये बाजार भांडवल असणारी स्मॉल कॅप कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Deep Diamonds share price return and Stock Split ratio on 3 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या