Multibagger Stock | पैशाचा मुसळधार पाऊस! या 3 रुपयाच्या पेनी शेअरने 2277% परतावा दिला, आजही आहे इतका स्वस्त, खरेदी करावा?

Multibagger Stock | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी 2022 हे वर्ष फार निराशाजनक राहिले आहे. अशा अस्थिर काळातही अनेक कंपनीच्या शेअर्सनी लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, तो स्टॉक या वर्षातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. ही कंपनी मुख्यतः कोळसा पुरवठा करण्याचे काम करते. ऊर्जा संकटाच्या वेळी या कंपनीने कमालीची कामगिरी केली, आणि त्याच्या शेअरमध्ये अद्भूत वाढ पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
आपण ज्या कंपनीच्या शेअरबद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे,”हेमांग रिसोर्सेस लिमिटेड”. ही कंपनी पूर्वी भाटिया इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नांवाने ओळखली जात होती. जर आपण या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरने एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 2, 277 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स फक्त 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या शेअरची किंमत 66 रुपयांवर पोहोचली आहे. ही कंपनी कोळसा व्यापार आणि पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेतात व्यापार करते. हेमांग रिसोर्सेस कंपनी परदेशातून आयात केलेला आणि भारतात उत्पादन केलेला देशी कोळसा विकण्याचे काम करते. हेमांग रिसोर्सेस कंपनी भारतात स्टीव्हडोरिंग आणि लॉजिस्टिक सेवा देखील प्रदान करते.
सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीने एकूण 155.53 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. हा एक पेनी स्टॉक असून त्यावर खूप कमी लोक विश्वास ठेवतात, परंतु हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 155.53 कोटी रुपये महसूल कमावला होता, आणि याच तिमाहीत कंपनीला 19.52 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता.
एप्रिल-ऑक्टोबर कंपनीचा व्यापार :
2022 या वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारतीय वीज क्षेत्राने आयात केलेला कोळसाचे प्रमाण 38.84 दशलक्ष टन होते. 7 डिसेंबर 2022 रोजी संसदेत ही माहिती देण्यात आली की, भारतात आयात कोळशाची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्के वाढण्याची शक्यता आहे. हेमांग रिसोर्सेस कंपनीसारख्या कोळसा पुरवठादारांना कोळशाची मागणी वाढल्यामुळे आणि कोळशाची किंमत वाढल्यामुळे चांगलाच फायदा होताना दिसत आहे.
कंपनीच्या नावात अनेकदा बदल :
1993 साली हेमांग रिसोर्सेस या कंपनीची स्थापना एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून झाली होती. त्यावेळी कंपनीचे नाव BCC हाउसिंग फायनान्स अँड लीजिंग कंपनी लिमिटेड या नावाने रजिस्टर केले होते. 2006 कंपनीचे नाव बदलून भाटिया इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करण्यात आले. पुन्हा 2015 मध्ये कंपनीच्या नावात बदल करण्यात आला आणि “हेमांग रिसोर्सेस”असे ठेवण्यात आले. आणि नावसोबत कंपनीचा मुख्य व्यवसाय बदलून कंपनी कोळसा पुरवठा क्षेत्रात उतरली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Hemang Resources Share Price in focus check details on 24 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH