
Multibagger Stocks | शेअर बाजारातून पैसे कमावणे खूप सोपे आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त संयम राखण्याची गरज आहे. गुंतवणुकीसाठी तुम्हाला योग्य स्टॉक निवडता आला पाहिजे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कोणताही स्टॉक अल्पावधीत हवा तसा परतावा देत नाही, अश्या वेळी स्टॉक दीर्घकाळ होल्ड करून ठेवल्यास तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटीने वाढू शकते. दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावून देणाऱ्या स्टॉक मध्ये एका सरकारी कंपनीचाही समावेश होतो. या कंपनीचे नाव आहे, IOCL.
Indian Oil Corporation ने आपल्या गुंतवणूकदाराना दीर्घकाळात अप्रतिम नफा कमावून दिला आहे. या कंपनीने मागील काही वर्षात कमालीची कामगिरी केली आहे. शेअर्स मध्ये सातत्याने वाढ होत असून गुंतवणूकदारांना त्यांतून जबरदस्त पैसा कमावला आहे. कंपनीने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना बोनसद शेअर्स वितरीत करून करोडपती बनवले आहे. Indian Oil Corporation ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे.
बोनस शेअर्सचे फायदे :
Indian Oil Corporation कंपनी चे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमवून देत आले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 21 वर्षांपूर्वी ह्या कंपनीच्या शेअर मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्यांना 7 रुपये प्रति शेअर किमतीवर 14,285 शेअर्स मिळाले असते 2009 साली कंपनीनं बोनस शेअर्सची घोषणा केली होती, हे बोनस शेअर्स जोडून एकूण शेअर्सची संख्या 28,570 झाली असती. 2016 साली कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा बोनस शेअर्स वितरीत केले, आणि हे शेअर्स जोडून एकूण शेअर्सची संख्या 57,140 पर्यंत गेली. IOCL कंपनीने 2018 मध्ये पुन्हा एकदा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत केले आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या 1,14,280 पर्यंत गेली. त्याच वेळी, चालू वर्ष 2022 मध्ये कंपनीने पुन्हा एकदा बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आणि याघोषणेनंतर, दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या शेअर्सची एकूण संख्या 1,71,420 पर्यंत वाढली.
1 लाखाचे झाले 1.12 कोटी :
Indian Oil Corporation कंपनीचे शेअर सध्या शेअर बाजारात 65.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 21 वर्षांपूर्वी या कंपनीवर विश्वास दाखवून एक लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर तुमच्या कडे एकूण 1,71,420 शेअर्स असते आणि सध्याच्या बाजार भावानुसार तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1.12 कोटी रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.