29 April 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Penny Stocks | 1 रुपया 96 पैशाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, या स्वस्त पेनी स्टॉकबद्दल जाणून घ्या

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजारावर जागतिक घडामोडींचा परिणाम होत असून, मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारात सुस्ती पाहायला मिळत आहे. अश्या परिसथितीतही भारतीय शेअर बाजारात असे काही स्टॉक आहेत, जे तग धरून ट्रेड करत आहेत, आणि आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहेत सोबत बोनस शेअर्स ही जाहीर करत आहेत. आज आपण अशाच एका स्मॉल कॅप कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत जी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर वितरीत करण्याची तयारी करत आहे. या कंपनीचे नाव आहे, “प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस”.

“प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस” ह्या कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 2 बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सध्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केले नाही. सध्या या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे.

बोनस शेअर्सची घोषणा :
26 सप्टेंबर 2022 रोजी प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेसने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 2:1 या गुणोत्तर प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली. बोनस शेअर जाहीर केल्यावर 26 सप्टेंबरपासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अपर सर्किटवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे बाजार भांडवल 41 कोटी रुपये असून, या वर्षी एप्रिलमध्येच कंपनीने स्टॉक स्प्लिट जाहीर केले होते आणि आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर ल 1 रुपये दर्शनी मूल्य स्प्लिट केले होते. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेसच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.08 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 0.92 रुपये होती.

एकूण परतावा आणि ट्रेडिंग किंमत :
प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सनी एका महिन्यात आपल्या भागधारकांना 25 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 29 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 1.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी प्रो फिन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत आपल्या भागधारकांना 18 टक्के पेक्षा अधिक नफा कमवून दिला आहे. गुरुवारी बाजारात ट्रेडिंग सुरू झाल्यावर BSE वर सूचीबद्ध असलेल्या या पेनी स्टॉकचे 1 तासात 16.87 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. मागील 20 ट्रेडिंग सेशनमध्ये सरासरी 31.78 लाख शेअर्सची खरेदी विक्री झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Pro Fin Capital Services limited share price check details on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x