
Multibagger Stock | सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. ही कंपनी मुख्यतः एलपीजी सिलिंडरचे उत्पादन करते. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. ज्या लोकांकडे रेकॉर्ड तारीख पर्यंत या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना बोनस शेअर्सचे वाटप केले जातील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sarthak Industries Share Price | Sarthak Industries Stock Price | BSE 531930)
बोनस वाटपाची रेकॉर्ड डेट :
सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक तीन शेअर्सवर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक बोनस शेअर मोफत देणार आहे. या कंपनीने या बोनस इश्यूसाठी 20 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. सार्थक इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 113.77 कोटी रुपये आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 3.89 टक्क्यांच्या कमजोरीसह 163.25 रुपयांवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक 164.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 5 मार्च 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षांत या शेअर्सची किंमत 2,683.19 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 3 वर्षांपूर्वी BSE निर्देशांकावर सार्थक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 7.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 1,985.64 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले असते तर, आज तुम्हाला 65 टक्क्यांचा मजबूत परतावा मिळाला असता. त्याचवेळी 2022 मध्ये सार्थक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 52.35 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या पोझीशनल गुंतवणूकदारांना 193.10 टक्क्यांची बंपर परतावा कमावून दिला आहे. सार्थक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 216.05 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 46.10 रुपये होती. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत या कंपनीमध्ये प्रवर्तकांची एकूण गुंतवणूक हिस्सेदारी 36.27 आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 63.73 टक्के गुंतवणूक हिस्सेदारी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.